Jio कडून फ्री कॉल सर्विस बंद केल्यानंतर वोडाफोन-आयडिया देणार ग्राहकांना 'ही' सुविधा
कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
रिलायन्स जिओने (Reliance Jio) अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कंपनीने इंटरकनेक्ट युजेस चार्ज आकारण्यात येणार आहे. रिलायन्स जिओने बुधावीर याबाबत घोषणा केली. त्यामुळे आज वोडाफोन-आयडिया लिमिटेड यांनी आययुसी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) यांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अन्य कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
वोडाफोन-आयडिया यांनी असे म्हटले की, त्यांच्या ग्राहकांवर कोणताही दबाब टाकण्यात येणार नाही आहे. ट्वीट करत असे म्हटले आहे की, वोडाफोन कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेले वचनाचा आनंद घ्या. वोडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर सध्या फ्री कॉलची सुविधा दिली जाते.(Jio युजर्सला झटका, आता दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे)
जिओने नॉन जिओ नेटवर्क म्हणजेच दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नेटवर्कवर फोन करण्यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार असल्याचे जाहीर केले आहे. तर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे यानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे फुकटात कॉलिंग करणे आता जिओ युजर्सला भारी पडणार आहे. परंतु कंपनीने असे म्हटले आहे की, 6 पैसे देण्याच्या बदल्यात जिओ युजर्सला अतिरिक्त डेटा देणार आहे.
त्याचसोबत रिलायन्स जिओ यांनी असे म्हटले की, Interconnect Usage Charge च्या कारणामुळे लावण्यात आलेल्या TRAI चा हा नियम आहे. 2017 मध्ये ट्रायने IUC साठी 14 पैसे घट करुन 6 पैसे केले होते. रिलायन्स जिओनेसुद्धा आता एअरटेल, आयडिया, वोडाफोन यांना IUC चार्जच्या अंतरग्त 13500 करोड रुपये दिले आहेत.