Jio युजर्सला झटका, आता दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे

भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) यांनी आता युजर्सला मोठा झटका दिला आहे. कारण आता नॉन जिओ नेटवर्क (Non-Jio Network) म्हणजेच दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नेटवर्कवर फोन करण्यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.

Jio युजर्सला झटका, आता दुसऱ्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी युजर्सला मोजावे लागणार पैसे
Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio)  यांनी आता युजर्सला मोठा झटका दिला आहे. कारण आता नॉन जिओ नेटवर्क (Non-Jio Network) म्हणजेच दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल नेटवर्कवर फोन करण्यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. तर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे यानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे फुकटात कॉलिंग करणे आता जिओ युजर्सला भारी पडणार आहे. परंतु कंपनीने असे म्हटले आहे की, 6 पैसे देण्याच्या बदल्यात जिओ युजर्सला अतिरिक्त डेटा देणार आहे.

मात्र जिओवरुन जिओ क्रमांकावर किंवा जिओच्या लॅडलाईनवरुन फोन केल्यास शुल्क आकारले जाणार नाही आहेत. कंपनीने चार वाउचर सादर केले आहेत. त्यानुसार युजर्सला जिओ रिजार्च करावा लागणार आहे. परंतु महिन्याभराच्या पॅकसह हे वाउचर रिजार्च करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(खुशखबर! Jio कडून दिवाळीची बंपर ऑफर; आता जिओफोन विकत घ्या अवघ्या 699 मध्ये, जाणून घ्या इतर माहिती)

>>पुढील चार टॉप जिओ प्लॅनसह युजर्सला मिळणार फ्री डेटा:

-10 रुपयांच्या टॉप अपमध्ये 124 नॉन जिओ मिनिट देण्यात येणार असून 1GB डेटा फ्री दिला जाणार आहे.

-20 रुपयांच्या टॉप अप प्लॅनमध्ये 249 नॉन जिओ मिनिटसह 2GB डेटा मिळणार आहे.

-50 रुपयांच्या रिचार्जमध्ये 656 नॉन जिओ मिनिट्स आणि 5GB डेटा देण्यात येणार आहे.

-100 रुपयांच्या रिचार्जमध्ये 1362 नॉन जिओ मिनिट्सह 10GB डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओ यांनी असे म्हटले की, Interconnect Usage Charge च्या कारणामुळे लावण्यात आलेल्या TRAI चा हा नियम आहे. 2017 मध्ये ट्रायने IUC साठी 14 पैसे घट करुन 6 पैसे केले होते. रिलायन्स जिओनेसुद्धा आता एअरटेल, आयडिया, वोडाफोन यांना IUC चार्जच्या अंतरग्त 13500 करोड रुपये दिले आहेत.

अद्याप ट्राय यांनी झीरो टर्मिनेशर चार्जची व्यवस्था लागू केलेली नाही. परंतु नॉन जिओ नेटवर्कसाठी युजर्सकडून शुल्क आकाराण्यात येणार आहेत. जिओला ट्रायच्या इंटरकनेक्ट युजेस चार्ज संपवायचा आहे.जर असे झाल्यास जिओ युजर्सला पुन्हा फुकटात कॉलिंग करता येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2019 10:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).