Vodafone Idea चा नवा 'Digital Exclusive' प्रीपेड प्लॅन; केवळ 'या' ग्राहकांनाच मिळणार लाभ
या प्लॅनचा लाभ केवळ Vi च्या वेबसाईटवरुन सीम कार्ड ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहाकांनाच मिळणार आहे.
वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) ने नवा 'डिजिटल एक्सक्युझिव्ह प्रीपेड प्लॅन' (Digital Exclusive Prepaid Plan) लॉन्च केला आहे. या प्लॅनचा लाभ केवळ Vi च्या वेबसाईटवरुन सीम कार्ड ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहाकांनाच मिळणार आहे. या प्लॅनची किंमत 399 रुपये इतकी असून कंपनीच्या ऑफलाईन आऊटलेटवर हा प्लॅन उपलब्ध होणार नाही. ऑफलाईन आऊटलेटमध्ये युजर्संना 97, 197, 297, 497 आणि 647 रुपयांचे फर्स्ट रिचार्ज प्लॅन्स मिळतील. टेलीकॉमच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या नेटवर्कमध्ये गेल्या 3 दिवसांत 3 लाख ग्राहकांनी आपली पसंती दाखवली आहे.
Vi युजर्ससाठी 399 च्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली असून हा प्लॅन 56 दिवसांसाठी व्हॅलिट आहे. जे ग्राहक Vi च्या नवीन सिम कार्डसाठी वेबसाईटवरुन अप्लाय करतील अशाच ग्राहकांना या नव्या प्लॅनचा लाभ मिळेल. नवीन सिम घेण्यास इच्छुक असलेले युजर्स 297 चा प्लॅन सुद्धा सिलेक्ट करु शकतात. या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 1.5GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिडेट कॉलिंग दिली असून हा प्लॅन 28 दिवसांची व्हॅलिड आहे. (Vi चा नवा 269 रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच, मिळणार 4GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा)
जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर नसाल तर मोबाईल नंबर पोर्ट करुन तुम्ही वोडाफोन आयडियामध्ये सामिल होऊ शकता. तुमचा जूना नंबर न बदलता तुम्हाला Vi चे नवे सिम कार्ड मिळेल. मोबाईल नंबर पोर्टबिलिटीद्वारे Vi फॅमेलीमध्ये एन्ट्री करु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी देखील हा 399 चा प्लॅन उपलब्ध आहे. Vi च्या पोस्टपेड युजर्ससाठी देखील 399 चा वेगळा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना महिन्याभरासाठी 40GB डेटा मिळतो. तर 6 महिन्याची व्हॅलिटीडी असलेला 150GB एक्स्ट्रा डेटा मिळतो. हा प्लॅन घेणाऱ्या युजर्संना Vi मुव्हीज आणि टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
टेलिकॉम रिग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या सर्वात अधिक कॉल क्वॉलिटी युजर रेटिंगमध्ये वोडाफोन आयडियाने रिलायन्स जिओ आणि एअरटेलला मागे टाकले आहे, ट्रायमधून मिळालेल्या टेडानुसार, सर्व सर्व्हिस प्रॉव्हायडरमध्ये आयडियाची व्हाईस क्वॉलिटी सर्वाधिक चांगली असून त्यामागे वोडाफोनचा नंबर लागतो.