युजर्सकडून 1GB डेटासाठी 35 रुपये आकारण्याची वोडाफोन कंपनीची मागणी
कारण गेल्या काही काळापासून तोट्यात सुरु असलेली वोडाफोन-आयडिया कंपनी आता युजर्सकडून 1GB डेटासाठी 35 रुपये घेण्यात यावी अशी मागणी करत आहे.
वोडाफोन-आयडिया युजर्ससाठ वाईट बातमी आहे. कारण गेल्या काही काळापासून तोट्यात सुरु असलेली वोडाफोन-आयडिया कंपनी आता युजर्सकडून 1GB डेटासाठी 35 रुपये घेण्यात यावी अशी मागणी करत आहे. म्हणजेच सध्याच्या रिजार्च पॅकच्या किंमतीच्या सातपट अधिक रक्कम त्यासाठी वसूल केली जाणार आहे. तसेच 1 एप्रिल पासन कंपनी कनेक्शनच्या किंमतीत आणि वॉइस कॉलसाठी सुद्धा प्रति मिनिट 6 पैसे आकारण्याची शक्यता आहे. कंपनी तोट्यामधून बाहेर येण्यासाठी नवे मार्ग शोधत आहे. हेच कारण आहे की कंपनी युजर्सकडून कनेक्शनच्या किंमती वाढवत आहे. जर कनेक्शन चार्ज लागू झाल्यास तर युजर्सला क्रमांक सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षाला जवळजवळ 600 रुपये मोजावे लागणार आहेत. वोडाफोनने नुकताच डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम यांना चिठ्ठी लिहून याबाबत मागणी केली आहे.
वोडाफोन-आयडिया यांना थकबाकी AGR अंतर्गत 53 हजार कोटी रुपये द्यायची आहे. या नुकसानीमागील मुख्य कारण म्हणजे कंपनी टेलिकॉम सर्व्हिसचे काम भारतात अत्यल्प स्वस्त असल्याचे म्हटले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, उद्योगात वाढती स्पर्धा असल्यामुळे त्यांना दरही जास्त कमी करावे लागत आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओच्या आगमनाने वोडाफोन-आयडियाच्या व्यवसाय आणि महसूल मध्ये लक्षणीय घट झाली आहे.कंपनीचे असे म्हणणे आहे की, डिसेंबर 2019 मध्ये रिचार्जचे दर वाढवून सुद्धा सर्विस कॉस्ट पूर्ण होत नाही आहे. तसेच टॅरिफ पुन्हा महाग करण्यासाठी सरकारी रेग्युलेशनची गरज आहे. त्याशिवाय कोणतीही कंपनी त्यांचे टॅरिफ अधिक महाग करु शकत नाहीत.(भारतामधील नेटफ्लिक्स युजर्सना झटका; बंद झाले पहिल्या महिन्यातील Free Subscription)
वोडाफोन जर त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये पुन्हा वाढ करत असेल तर त्याच्या किंमती 1000% पेक्षा अधिक होईल. सध्या कंपनीचा 558 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. दिवसाला 3 जीबी डेटा मिळणाऱ्या या प्लॅनसाठी युजर्सला प्रति जीबी 3.32 रुपये द्यावे लागतात. पण कंपनीने प्रति जीबी 35 रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतल्यास तर हा प्लॅन 1054 टक्क्यांनी महागणार आहे.