खूशखबर! आता यूजर्स Facebook वर कंटेंट च्या माध्यमातून करू शकतात कमाई; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
परंतु हे वैशिष्ट्य केवळ शॉर्ट व्हिडिओ तयार करणार्यांसाठी उपलब्ध असेल.
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक (Facebook) लवकरचं कंटेंटच्या मदतीने वापरकर्त्यांसाठी कमाईचे साधन घेऊन येत आहे. म्हणजेचं फेसबुकवर पोस्ट्स आणि फोटो शेअर करण्याबरोबरंच तुम्ही पैसे मिळवू शकता. परंतु हे वैशिष्ट्य केवळ शॉर्ट व्हिडिओ तयार करणार्यांसाठी उपलब्ध असेल. कंपनीने शॉर्ट व्हिडिओ कंटेंटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामध्ये फेसबुक व्हिडिओ बनविणारे वापरकर्ते व्हिडिओ दरम्यान दर्शविलेल्या जाहिरातीद्वारे पैसे कमविण्यास सक्षम असतील. चला तर मग फेसबुकच्या आगामी फिचरबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात...
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील याची प्रारंभिक चाचणी केली जाईल. आम्हाला लवकरचं हे फिचर अधिक कंटेंट निर्मात्यांपर्यंत पोहोचवयाचे आहे. जेणेकरून आम्ही अधिकाधिक कंटेंट निर्मात्यांना जोडले जाऊ. (वाचा - WhatsApp चॅट लीक होण्याची भीती होणार दूर; कंपनी लवकरचं अपडेट करत आहे 'हे' फीचर)
सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने म्हटले आहे की, कंपनीने आपले इन-स्ट्रीम जाहिरातीची पात्रता अपडेट केली आहे. जेणेकरून अधिक व्हिडिओ निर्माते प्रोग्राममध्ये प्रवेश करू शकतील आणि पेमेंट केलेल्या ऑनलाइन इव्हेंटचा अधिक विस्तार करू शकतील. याशिवाय यूजर्संना या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये आपला चाहता वर्ग वाढवता येईल.
फेसबुकने म्हटलं आहे की, यासाठी युजर्संची पात्रता, निकष अपडेट करण्यात आले आहेत. जेणेकरून अधिक कंटेंट निर्माता शॉर्ट व्हिडिओ दरम्यान येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून कमाई करू शकतील. फेसबुकच्या या योजनेमुळे अनेक युजर्संना मोठा दिलासा मिळाला आहे.