अमेरिकेतील शाळांनी Google, Meta आणि Snapchat विरुद्ध दाखल केले खटले; मुलांना मानसिकरित्या आजारी बनवत असल्याचा आरोप

हा वयोगट इंटरनेटशी मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. अशा लोकांकडे जवळजवळ सर्व प्रकारची सोशल मीडिया खाती असण्याची शक्यता जास्त आहे.

Social Media (Photo Credit - Pixabay)

अमेरिकेतील मेरीलँड (US, Maryland) राज्यातील जिल्हा शाळा प्रशासनाने मेटा, गुगल, स्नॅपचॅट आणि टिकटोक (Meta, Google, Snapchat, TikTok) यांच्यावर खटला दाखल केला आहे. शाळेने आरोप केला आहे की, या कंपन्या मुलांच्या ‘मानसिक आरोग्याच्या संकटात’ मोठे योगदान देत आहेत. हॉवर्ड काउंटी पब्लिक स्कूल सिस्टमने (Howard County Public School) दाखल केलेल्या खटल्यात असे म्हटले आहे की, मुले धोकादायक आणि व्यसनाधीन सोशल मीडिया उत्पादनांमुळे मोठ्या मानसिक आरोग्य संकटाचा सामना करत आहेत.

गेल्या दशकभरात सोशल मीडियाशी अमेरिकन लोकांची संलग्नता झपाट्याने वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केवळ वापरकर्त्यांची संख्याच वाढवली नाही, तर अशा प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा वेळही वाढला आहे. खटल्यामध्ये म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या वापरकर्त्यांचे मानसशास्त्र आणि न्यूरोफिजियोलॉजीनुसार प्लॅटफॉर्मचे डिझाइन आणि ते चालवण्याचे पर्याय वापरले आहेत. यामुळे वापरकर्ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ घालवू शकतील.

खटल्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक समस्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये टिकटोकचे ‘For you’ पेज, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे अल्गोरिदम आणि इतर फीचर्सचाही उल्लेख आहे. या गोष्टी वारंवार आणि जास्त उत्पादनाच्या वापरासाठी हानिकारक लूप तयार करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. अमेरिकेतील तरुणांमध्ये मानसिक आरोग्य संकट निर्माण करण्यासाठी कंपन्यांनी जाणूनबुजून या तंत्रांचा शोध लावला असल्याचे खटल्यात म्हटले आहे. तसेच यामळे युजर्स अशा प्लॅटफॉर्मवर खर्च करत असलेल्या रकमेतही वाढ झाली आहे. (हेही वाचा: आयफोन कंपनी अॅपल भारतामध्ये उघडणार आणखी 3 स्टोअर्स; मुंबईमध्ये सुरु होणार नवी दोन दुकाने, जाणून घ्या सविस्तर)

किशोरवयीन मुले ही कंपन्यांच्या व्यवसायाच्या मॉडेलच्या केंद्रस्थानी असतात. हा वयोगट इंटरनेटशी मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. अशा लोकांकडे जवळजवळ सर्व प्रकारची सोशल मीडिया खाती असण्याची शक्यता जास्त आहे. तसेच त्यांच्याकडे सोशल मीडियावर व्यतीत करण्यासाठी अधिक वेळ असण्याची अधिक शक्यता आहे. वॉशिंग्टन, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी, अलाबामा, टेनेसी आणि इतर ठिकाणांच्या शाळा प्रशासनानेही मुलांच्या मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावांवर असे खटले दाखल केले आहेत.