UPI System: यूपीआय प्रणालीच्या सुविधेसाठी भारत आणि New Zealand वाढवणार परस्परांतील सहकार्य
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या उद्योग आणि उद्योग संघटनांच्या संयुक्त बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये 1986 च्या द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त व्यापार समितीची (JTC) उद्दिष्टे पुढे नेण्यावरही सविस्तर विचार करण्यात आला.
UPI प्रणाली (Unified Payments Interface) सुलभ करणे, व्यापार समस्यांचे वेळेवर निराकरण, वर्क व्हिसा आणि बँकिंग संबंध सुधारणे यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासंदर्भात भारत (India) आणि न्यूझीलंडने (New Zealand) नुकताच निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराचे सध्याचे प्रमाण पाहता, दोन्ही बाजूंनी परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात वाढीव आर्थिक संबंधांसाठी समन्वय आणण्याची प्रचंड क्षमता आणि गरज असल्याचे परस्परांकडे कबूल केले.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांच्या उद्योग आणि उद्योग संघटनांच्या संयुक्त बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये 1986 च्या द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त व्यापार समितीची (JTC) उद्दिष्टे पुढे नेण्यावरही सविस्तर विचार करण्यात आला. या बैठकीला वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त डेव्हिड पाइन उपस्थित होते.
अतिरिक्त सचिवांनी यूपीआय प्रणालीची सुविधा, कार्बन क्रेडिट, किवी फळांवरील पॅकेज प्रस्ताव, ट्रान्स-शिपमेंट हब, द्विपक्षीय व्यापार समस्यांचे वेळेवर निराकरण करण्यासाठी प्राधान्य, सहयोग यासह सहकार्याच्या विविध क्षेत्रांची तात्पुरती ओळख करून देण्याच्या चर्चेतील सकारात्मकतेचे कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या मुद्द्यांवर, वर्क व्हिसा (Work Visa) संबंधित समस्यांसारख्या सेवांमध्ये सहकार्य, बँकिंग संबंध आणखी सुधारणे, यांवरही चर्चा झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले. (हेही वाचा, How To Use UPI Lite: यूपीआय लाईट कसे वापरावे? App, फिचर आणि व्यवहार याबाबत घ्या जाणून)
वानिज्य मंत्रालायने पुढे म्हटले की, न्यूझीलंडच्या उच्चायुक्तांनी शोधलेल्या काही क्षेत्रांमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) प्रणालीला प्रोत्साहन देणे, कार्बन क्रेडिट को-ऑपरेशन आणि झेस्प्रीने दिलेला सर्वसमावेशक प्रस्ताव आणि विनंत्यांचे प्राधान्य यासारख्या विशिष्ट मुद्द्यांवर एकत्र काम करणे यांसारखे मुद्देही समाविष्ट आहेत.
यूपीआय म्हणजे काय?
UPI किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही एक तात्काळ रीअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. जी मोबाइल डिव्हाइसद्वारे बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरण सक्षम करते. 2016 मध्ये लाँच केलेला, UPI हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा एक उपक्रम आहे. RBI द्वारे त्याचे नियमन केले जाते. UPI भारतात कमालीचे लोकप्रिय झाले आहे, एकट्या जानेवारी २०२२ मध्ये २ अब्जाहून अधिक व्यवहार झाले आहेत. UPI ही एक संकल्पना आहे जी एकाधिक बँक खात्यांना एकाच मोबाइल ऍप्लिकेशनमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. ही कल्पना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केली आहे आणि आरबीआय आणि आयबीए (इंडियन बँक असोसिएशन) द्वारे नियंत्रित आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)