Twitter इंडियाचे CEO मनीष माहेश्वरी आता अमेरिकेत सांभाळणार नवी भुमिका
ट्विटर (Twitter) इंडियाचे सीईओ मनीष माहेश्वरी (Manish Maheshwari) अमेरिकेत आता नवी भुमिका साकारणार आहेत.
ट्विटर (Twitter) इंडियाचे सीईओ मनीष माहेश्वरी (Manish Maheshwari) अमेरिकेत आता नवी भुमिका साकारणार आहेत. तेथे मनीष हे रेवेन्यू स्ट्रेटेजी अॅन्ड ऑपरेशन्सचे सीनियर डायरेक्टरच्या पदासह न्यू मार्केटवर सुद्धा लक्ष देणार आहेत. गेल्या दिवसात ट्विटर आणि सरकारमध्ये सुरु असलेल्या वादादरम्यान मनीष माहेश्वरी सुद्धा चर्चेत होते. MoneyControl ने या निर्णयाची घोषणा करणार्या ईमेलच्या कॉपीची समीक्षा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, ट्विटरवर पाठवण्यात आलेल्या ईमेल आणि माहेश्वरी यांच्या मेसेजचे काही उत्तर आलेले नाही.
दरम्यान, ट्विटरचे सीनियर एक्झिक्युटिव्ह यू सासामोटो यांनी ट्विटवर या बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी असे म्हटले की, गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक वर्षाच्या आमच्या भारतीय बिझनेसच्या नेतृत्वासाठी मनीष माहेश्वरी यांचे धन्यवाद. अमेरिकेत वर्ल्डवाइड न्यू मार्केटच्या रेवेन्यू स्ट्रेटेजी अॅन्ड ऑपरेशन्स प्रभारीच्या नव्या भुमिकेसाठी शुभेच्छा. तुम्हाला देण्यात आलेल्या या पदासाठी खुश आहे.(Facebook Vs TikTok: फेसबुकला टक्कर देत टिकटॉक ठरले जगात सर्वाधिक डाऊनलोड होणारे 'नंबर वन अॅप')
Tweet:
ईमेल मध्ये असे लिहिण्यात आले होते की, आमचे भारताचे डारेक्टर आणि भारताच्या हेड रुपात 2 वर्षांहून अधिक काळापर्यंत टीमला सपोर्ट केल्यानंतर मनीष सैन फ्रांसिस्को मध्ये सीनियर डायरेक्टर, रेवेन्यू स्ट्रेटेजी अॅन्ड ऑपरेशन वर नव्या भुमिका निभवणार आहेत. जी न्यू मार्केट एन्ट्रीवर केंद्रित आहे. ईमेल नुसार कनिका मित्तल या ट्विटरच्या सध्या सेल्स हेड आणि नेहा शर्मा कत्याल यांना सध्याच्या बिझनेस हेड, ट्विटर इंडियाला मिळून लीड करणार आहेत. ट्विटर JAPAC/Twitter जापानचे वाइस प्रेसिडेंट यू सासामोटो यांना रिपोर्ट करणार आहेत.