150 व्या गांधी जयंती निमित्त ट्विटरची खास इमोजी

ट्विटर इंडियाने आज गांधी जयंती निमित्त विशेष इमोजी शेअर केली आहे.

गांधी जयंती (Photo Credit: Twitter)

भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळख असलेले महात्मा गांधीजींची यंदा १५० वी जयंती आहे. गांधीजींच्या जयंती निमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन . करण्यात . आले आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. ट्विटर इंडियाने आज गांधी जयंती निमित्त विशेष इमोजी शेअर केली आहे. विशिष्ट हॅशटॅग वापरल्यानंतर तुम्हांला गांधीजींचा इमोजी दिसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींच्या इमोजीचं अनावरण केलं आहे. #GandhiJayanti, #MKGandhi, #BapuAt150, #MahatmaGandhi, #MyGandhigiri, #MahatmaAt150, #NexusOfGood हे हॅशटॅग वापरल्यानंतर तुम्हाला गांधीजींचा इमोजी दिसणार आहे. ट्विटर आणि ट्विटर लाईट अशा दोन्ही प्लॅटफॉर्म वर हा  इमोजी दिसणार आहे. २ ऑकटोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. मात्र ट्विटर वर गांधीजींचा इमोजी ८ ऑक्टोबर पर्यंत दिसणार आहे.

गांधी जयंती पूर्वी ट्विटर ने भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिन, दिवाळी, योगा दिनाच्या दिवशीही अशाप्रकारचा इमोजी दिला होता. काही सिनेमाच्या प्रमोशन मध्येही ट्विटरने खास इमोजी शेअर केले होते.