Coronavirus: दुरसंचार कंपन्यांनाही Lockdown काळात फटका, 56 लाख मोबाईल यूजर सब्सक्राईबर गमावले, ट्रायची माहिती
रिलायन्स जिओ ने या काळात (काही महिने) 36.57 लाख सब्सक्राइबर जमवले. त्यामुळे या कंपनीच्या यूजर्सची संख्या 39.27 कोटी इतकी झाली आहे.
दुरसंचार कंपन्यांनी (Telecommunications Companies) लॉकडाऊन (Lockdown) काळात आपले सुमारे 56.11 लाख वायरलेस सब्सक्राइबर गमावले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( TRAI) ने प्रिसिद्ध केलेल्या डेटामध्ये ही माहिती पुढे आली आहे. मे महिन्यात वायरलेस कनेक्शन साठी दूरसंचार कंपन्यांचे सब्सक्राइबर साधारण 114.39 कोटी इतके होते. एप्रिल महिन्यात हिच संख्या 114.95 कोटी होती.
सब्सक्राइबरच्या संख्येत घट झाली असली तरी, रिलायन्स जिओ मात्र सब्सक्रिप्शनमध्ये पुढे आहे. रिलायन्स जिओ ने या काळात (काही महिने) 36.57 लाख सब्सक्राइबर जमवले. त्यामुळे या कंपनीच्या यूजर्सची संख्या 39.27 कोटी इतकी झाली आहे.
ट्रायने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या डेटानुसार, भारतीय एअरटेल आणि वोडाफोन-आयडीया यांच्या सब्सक्राइबरमध्ये सातत्याने घट होत आहे. एअरटेल आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांनी 47.42 लाख सब्सक्राइबर आणि 47.26 लाख सब्सक्राइबरनी दूरसंचार कंपनयांची साथ सोडली. या यूजर्सची संख्या घटून 31.78 कोटी आणि 30.99 कोटी झाली आहे. (हेही वाचा, Twitter ट्रेंडिंग लिस्टमध्ये झळकायचे आहे? 'या' सोप्प्या टीप्स जरुर फॉलो करा)
सरकारी कंपनी बीएसएनलने या काळात 2.01 लाख नवी कनेक्शन जोडली. त्यामुळे या कंपनीचे सब्सक्राइबर 11.99 कोटी इतकी झाली आहे. प्राप्त डेटानुसार मे महिन्यात 29.8 लाख सब्सक्राइबरने आपला मोबाईल नंबर पोर्टबिलीट (एमएनपी) करण्यासाठी अप्लाय केला.