To All The Coronavirus Helpers Thank You: धन्यवाद कोरोना व्हायरस मदतनीस म्हणत Google चे खास Doodle; डॉक्टर, सफाई कर्मचार्यांंचे मानले आभार
त्यांंच्या या कामासाठी आभार मानत आज गूगल तर्फे एक अनोखं डुडल साकारण्यात आलंं आहे
COVID 19 Warriors: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे हे आपण जाणताच आज घडीला जगातील जवळपास 3 कोटी जनता ही या व्हायरसच्या विळख्यात अडकली आहे आणि असे सगळे असताना याच जनतेच्या मदतीला देवासारखे धावुन आलेल्या कोविड योद्ध्यांंचे काम हे अनन्यसाधारण आहे. त्यांंच्या या कामासाठी आभार मानत आज गूगल तर्फे एक अनोखं डुडल साकारण्यात आलंं आहे. To All The Coronavirus Helpers, Thank You! असं म्हणत गूगल ने डॉक्टर, सफाई कर्मचारी, परिचारिका, प्रसूती कर्मचारी, शेतकरी,पोलिस,आपत्कालीन सेवा कामगार, आणि मुख्य म्हणजे कोरोनावरील लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारे संंशोधक या सगळ्यांंना धन्यवाद दिले आहेत. आणखीन एक विशेष म्हणजे न भुतो न भविष्यती अशा या कोरोना काळात सुद्धा शिक्षणात खंंड पडु न देणार्या सर्व शिक्षक वर्गाला सुद्धा या डूडल (Google Doodle) मध्ये स्थान देण्यात आलं आहे.
गुगल इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंट वरुन हे डूडल शेअर केले आहे तसेच तुम्ही गूगल सर्च पेज उघडताच सुद्धा तुम्हाला समोरच हे GIFs स्वरुपातील डूडल पाहायला मिळेल. या संकल्पनेच्या मार्फत सर्व देशातील नागरिकांंना निदान कोविड वॉरिअर्सच्या सन्मानासाठी आणि त्यांंचे काम आणखीन कठीण होउ नये या भावनेने तरी घरीच थांंबा असे आवाहन करण्यात आले आहे. COVID-19 Vaccine Update: Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या ट्रायल्सला युके मध्ये पुन्हा सुरुवात
Google Doodle Tweet
दरम्यान, गूगल ने आपल्या Google Doodle वेबसाईट वर सांंगितल्याप्रमाणे, कोरोना व्हायरस काळात जगभरातील लोक आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येत आहेत. यामध्येही अगदी जीव धोक्यात घालुन मदत करणार्यांंच्या कामाचं कौतुक करण्यासाठी ही खास गूगल डूडल सीरीज साकारण्यात आली आहे.