Tinder युजर्ससाठी मोठा बदल, App वर डेट करण्यासाठी दाखवावे लागणार शासकीय कागदपत्रं

टिंडरच्या (Tinder) युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे, टिंडरने जगभरातील युजर्ससाठी आयडी वेरिफिकेशन (ID Verification) फिचर जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

Tinder App (Photo Credits-Twitter)

टिंडरच्या (Tinder) युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे, टिंडरने जगभरातील युजर्ससाठी आयडी वेरिफिकेशन (ID Verification) फिचर जाहीर करण्याची घोषणा केली आहे. हे फिचर आता लवकरच रोलाउट केले जाणार आहे. कंपनीने असे म्हटले आहे की, तज्ञांच्या सांगण्यावरुन हे पाऊल उचलले आहे. या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित असणार असून युजर्सला आपल्या ओळखीसाठी कोणतेही एक शासकीय कागदपत्र या प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे लागणार आहे.(सावधान! POCO F3 GT खरेदी पूर्वी जाणून घ्या फोनसंबंधित 'या' महत्वाच्या गोष्टी)

टिंडरच्या मते युजर्सला आयडी सांगतेवेळी आपली ओळख म्हणून शासकीय कागदपत्र द्यावे लागणार आहे. यामुळे युजर्स सुरक्षित राहणार असून त्यांना माहिती मिळणार आहे की, ते नक्की कोणत्या व्यक्तीला भेटत असून कोणाशी बोलत आहेत. मात्र हे फिचर भारतात कधी लॉन्च केले जाईल याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही.

टिंडरचे आयडी वेरिफिकेशन फिचर प्रथम 2019 मध्ये जापानच्या युजर्ससाठी रोलाआउट केले होते. कंपनीने असे म्हटले आहे की, ही फिचर स्वैच्छिक असणार आहे. मात्र हे फिचर त्याच देशात लागू केले जाणार जेथे कायद्याद्वारे त्याच्या सुविधेची आवश्यकता असते.(Twitter इंडियाचे CEO मनीष माहेश्वरी आता अमेरिकेत सांभाळणार नवी भुमिका)

तर टिंडर अॅपला Bumble कडून टक्कर दिली जात आहे. तर बंबल हे अॅप व्हिटनी वोल्फ हेर्ड यांनी तयार केले आहे. व्हिटनी वोल्फ हेर्ड जगातील सर्वाधिक कमी वयाची महिला अरबपती आहे. बंबल हे अन्य डेटिंग अॅप हे थोडे वेगळे आहे. कारण हे अॅप खासकरुन महिलांसाठी आहे. यावर महिला ठरवतात की,त्यांना कोणासोबत डेटवर जायचे आहे. बंबलचे जगभरात 4 कोटीहून अधिक मंथली अॅक्टिव्ह युजर्स आहेत. यामध्ये 25 लाखांहून अधिक पेड युजर आहेत. हे डेटिंग अॅप जगातील 150 देशांमध्ये काम करते.