Timex चा शानदार फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक
Timex कंपनीने त्यांचा शानदार फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च केला आहे. या फिटनेस बँन्डसह Alloy केस, स्टेनलेस स्टील मॅश बँन्ड आणि सिलिकॉन स्ट्रॅप दिला आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास युजर्सला या फिटनेस बँन्डमध्ये दमदार बॅटरी मिळणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये 5 तासांपर्यंत बॅकअप देणार आहे. या व्यतिरिक्त कॉल- मेसेजच्या नोटिफिकेशन अलर्ट येण्यासंबंधित फिचर ही मिळणार आहे. या फिटनेस बँन्डची किंमत 4,495 रुपये आहे. टायमॅक्सचा हा नवा बँन्ड तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. टायमेक्सच्या रिटेल स्टोर मधून ही तुम्ही खरेदी करु शकता. फिटनेस बँन्ड Rose Gold आणि Black रंगाच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
टायमॅक्सच्या फिटनेस बँन्डच्या अन्य फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 0.96 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रेज्यॉल्यूशन 160X80 पिक्सल आहे. फिटनेस बँन्डमध्ये अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, म्युझिक कंट्रोल ते हार्ट रेट मॉनिटर आणि नोटिफिकेशन अलर्ट फिचर दिले आहे. तसेच दमदार बॅटरी सपोर्ट ही दिला गेला आहे.(WhatsApp Shopping Button: भारतासह जगभरात उपलब्ध झाले व्हॉट्सअॅपवर नवीन शॉपिंग बटण; चॅटमधून कॅटलॉग पाहून थेट खरेदी करू शकाल प्रॉडक्ट)
भारतीय बाजारात या फिटनेस बँन्डची टक्कर थेट Mi Band 5 सोबत होणार आहे. एमआय बँन्ड 5 बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.1 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो एमआय बँन्ड 4 च्या स्क्रिनच्या तुलनेत 20 पट अधिक मोठा आहे. या फिटनेस बँन्डमध्ये हार्ट रेड, स्लीप मॉनिटर करणारे सेंसर ते PAI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. युजर्सला या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला फिट राहण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत यामध्ये 11 स्पोर्ट्स मोड्स दिले आहेत. ज्यामध्ये योगा, इंडोर सायकलिंग आणि जंप रोप सारखे एक्सरसाइज मिळणार आहेत.(Amazon दिवाळी सेलमध्ये NETGEAR च्या Wi-Fi प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर्स, जाणून घ्या अधिक)
Mi Band 5 मध्ये दमदार बॅटरी दिली असून 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सेविंग मोड मध्ये 21 दिवसांचा बॅटरी बॅकअप देणार आहे. खासियत म्हणजे युजर्सला या बँन्डमध्ये युएसबीच्या ऐवजी मॅग्नेटिक पिन मिळणार आहे.