TikTok Goes Completely Offline in India: भारतातील वापरकरर्त्यांना टीक-टॉकवर व्हिडिओ पाहणे किंवा अपलोड करणे झाले बंद!
पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन विरोधात प्रचंड रोष आहे. अशात सोमवारी म्हणजेच 29 जून रोजी रात्री उशिरा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला. 59 चिनी अॅप्सवर भारताने बंदी घातल्याचे जाहीर केले. भारतात अधिक प्रसिद्धी मिळवणारे टिक-टॉक (Tik-Tok) ऍपचाही यात समावेश आहे
पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारतात चीन विरोधात प्रचंड रोष आहे. अशात सोमवारी म्हणजेच 29 जून रोजी रात्री उशिरा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला. 59 चिनी अॅप्सवर भारताने बंदी घातल्याचे जाहीर केले. भारतात अधिक प्रसिद्धी मिळवणारे टिक-टॉक (Tik-Tok) ऍपचाही यात समावेश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात टिकटॉकचे वापरकरर्ते आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच टिक टॉक व्हिडिओ बनवण्याचे किंवा पाहण्याचे जणू व्यसनच लागले आहे. मात्र. चीनी ऍप्समुळे भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. यातच भारतीय वापरकरर्त्यांना टीक-टॉकवर व्हिडिओ पाहणे किंवा अपलोड करणे पूर्णपणे बंद झाले आहे. ज्यामुळे टिक-टॉकच्या वापरकरर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत सरकारने 29 जून रोजी टिक-टॉकसह 59 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भारतीय सरकारच्या निर्देशांचे पालन करत आहोत. हा मुद्दा चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी आणि कृती करण्याचा मार्ग शोधण्यासाठी सरकारबरोबर काम करत आहोत. भारतातील आमच्या सर्व वापरकर्त्यांची खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देत आहोत, असे टीक-टॉक इंडियाच्या टीम म्हणाली आहे. हे देखील वाचा- Upsend File Sharing App: Xender, SHAREit ला टक्कर देतोय शुभम अग्रवाल या तरुणाचा मेड इन इंडिया अपसेंड ऍप; जाणुन घ्या फीचर्स (Watch Video)
फोटो-
टिक टॉक इंडियाचे ट्वीट-
भारताकडून बंदी घालण्यात आलेल्या टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउजर, हॅलो, बिग लाइव, सेल्फीसिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल झिओमी आणि विसिंक असे काही अॅप्स आहेत जे भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यापैकी अनेक कंपन्यांमध्ये 10 ते 12 हजारांहून अधिक जण काम करतात. त्यामुळे या कंपन्यानी भारतामधून गाशा गुंडळल्यास अंदाजे 10 ते 12 हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडेल, असे वृत्त नेटवर्क 18 हिंदीने दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)