तुमच्या न कळत बँक खात्यामधून पैसे काढतात 'हे' App, स्मार्टफोनमधून लगेच करा डिलिट
प्ले स्टोअरवर असे काही अॅप आहेत ज्याच्या माध्यमातून युजर्सच्या न कळत बँक खात्यामधून पैसे काढले जातात. खरंतर सिक्यॉर-डी टीमकडून करण्यात आलेल्या नव्या रिसर्चनुसार, 'ai.type' नावाचे असे एक आढळून आले आहे.
अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी धोकादायक अॅप संबंधित पूर्वसुचना देण्यात आली आहे. प्ले स्टोअरवर असे काही अॅप आहेत ज्याच्या माध्यमातून युजर्सच्या न कळत बँक खात्यामधून पैसे काढले जातात. खरंतर सिक्यॉर-डी टीमकडून करण्यात आलेल्या नव्या रिसर्चनुसार, 'ai.type' नावाचे असे एक आढळून आले आहे. त्याच्यामाध्यमातून युजर्सची फसवणूक केली जात आहे. तसेच युजर्सला त्याच्या कोणत्या सर्विसेसची चोरी केली आहे हे सुद्धा कळू शकत नाही.
मॅशबेल इंडिया यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे अॅप स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडमध्ये काम करते. त्यामध्ये युजर्सच्या न कळत फेक अॅड व्हु दिल्या जातात. त्याचसोत अॅप डिजिटल खरेदी सुद्धा करु शकते. त्यासाठी युजर्सच्या बँक खात्यामधील रक्कम चोरी केली जाते. ai.type एक थर्ड पार्टी keyboard अॅप असून ते 4 हजार करोड वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. हे अॅप इज्राइल कंपनीने बनवले असून त्याचे डिस्क्रिप्शन Free Emoji Keyboard सारखा देण्यात आला आहे.(तुम्ही सुद्धा 'हे' पासवर्ड वापरत आहात? सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमची गोपनिय माहिती होईल हॅक)
सिक्यॉर डी टीमने असे सांगितले आहे की, या अॅपच्या माध्यमातून जवळजवळ 18 मिलियन डॉलर चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सिक्यॉर डी यांनी ही चोरी पकडली होती. असे सांगण्यात आले आहे की, 110,000 मोबाईल मधून 14 मिलियन ट्रान्झेक्शन रिक्वेस्ट आल्या आहेत. रिपोर्टमध्ये असे ही सांगितले की, या अॅपमुळे 13 देश प्रभावित झाले आहेत. असे खतरनाक अॅप गुगल प्ले स्टोअर वर ब्लॉक करण्यात आले. मात्र ज्या युजर्सने हे अॅप डाऊनलोड केले आहे त्यांनी त्वरित डिलिट करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कारण या अॅपच्या माध्यमातून तुमची पैशासंबंधित फसवणूक होण्याची फार शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.