Tecno Pova Neo स्मार्टफोन लॉन्च, युजरला मिळणार 6000mAh च्या बॅटरीसह 'हे' धमाकेदार फिचर्स

टेक्नो कंपनीचा नवा स्मार्टफोन Tecno Pova Neo भारतात लॉन्च झाला आहे. फोन 6 जीबी रॅमच्या सपोर्टसह 3 जीबी वर्च्युअल रॅमचा सुद्धा सपोर्ट दिला गेला आहे. यामध्ये एकूण 11 जीबी रॅम मिळणार आहे.

Tecno Pova Neo Launched in India (Photo Credits-Twitter)

टेक्नो कंपनीचा नवा स्मार्टफोन Tecno Pova Neo भारतात लॉन्च झाला आहे. फोन 6 जीबी रॅमच्या सपोर्टसह 3 जीबी वर्च्युअल रॅमचा सुद्धा सपोर्ट दिला गेला आहे. यामध्ये एकूण 11 जीबी रॅम मिळणार आहे. तसेच 128 जीबी इंटरनल स्टोरेज ही युजरला दिला जाणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 6000mAh ची धमाकेदार बॅटरी दिली गेली आहे. 18W फास्ट चार्जरच्या मदतीने स्मार्टफोन चार्जिंग करता येणार आहे. कंपनीने फोनसाठी 6.8 इंचाचा डिस्प्ले सपोर्ट दिला आहे.

Tecno Pova Neo स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर कंपनीकडून 1499 रुपयांचे इअरबड्स ही फ्री दिले जाणार आहेत. 22 जानेवारी रोजी हा फोन सर्व रिटेल स्टोअर मध्ये उपलब्ध होणार आहे. फोन Powehi Black, Geek Blue आणि Obsidian Black रंगाच्या ऑप्शन मध्ये युजरला खरेदी करता येणार आहे.(Realme 9i भारतात लॉन्च; 11GB RAM 33W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळणार, जाणून घ्या किंमत आणि खास फिचर्स)

स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा HD+ नॉच डिस्प्ले दिला गेला आहे. फोनची स्क्रिन टू बॉडी रेश्यो 89.42 टक्के आहे. फोनमध्ये 480 nits चा पीक ब्राइटनेस दिला गेला असून 120Hz टच सॅम्पलिंग रेट मिळाला आहे. टेक्नो पोवा निओ स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला असून त्याचा मुख्य कॅमेरा 13MP चा असणार आहे. त्याचसोबत क्वाड फ्लॅशलाइट सपोर्टसह तो येणार आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा दिला गेला आहे. फोनच्या फ्रंट मध्ये ड्युअल फ्लॅश लाइट सपोर्ट मिळणार आहे.

कंपनीने फोनच्या रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट दिला गेला आहे. त्याचसोबत फोनमध्य फेस-लॉक फिचर ही दिले गेले आहे. 6 जीबी हाय कॅपासिटी LPDDR4x रॅम आणि 5GB एक्सपेंडेबल रॅम सपोर्ट मिळणार आहे. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 128जीबी eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज मिलणार आहे. फोनच्या स्पेसला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे.  फोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित HiOS v7.6 वर काम करणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, 55 दिवसांची स्टँडबाय बॅटरी लाइफ मिळणार आहे. फोन 18W फ्लॅश चार्जरच्या मदतीने एका तासात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement