iPhone XR विकत घ्या फक्त 14,999 रुपयांना
जगप्रसिद्ध अॅपल या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे.आता iPhoneXR साठी प्री- बुकिंग भारतात चालू झाली असून तो 14,999 च्या डाऊन पेमेंचवर विकत घेता येणार आहे.
जगप्रसिद्ध अॅपल या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आणली आहे.आता iPhoneXR साठी प्री- बुकिंग भारतात चालू झाली असून तो 14,999 च्या डाऊन पेमेंटवर विकत घेता येणार आहे. यामुळे आयफोनच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर गेल्या महिन्यात या कंपनीने तीन नवीन आयफोनची सिरिज बाजारात आणली होती. त्यामध्ये iPhone XS आणि iPhoneXS Max हे दोन फोन आधीच भारतात बाजारात विक्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.
या iPhoneXR करिता एअरटेलचे ऑनलाईन स्टोर, अॅमेझॉन इंडिया आणि जियोच्या अधिकृत संकेतस्थळावरुन या फोनचे प्री- बुकिंग करता येणार आहे. तर iPhone XR ची प्री- बुकिंग एअेरटलच्या ऑनलाईन स्टोरवरुन केल्यास ग्राहकांना तो 14,9999 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर विकत घेता येणार आहे. तसेच या फोनची विक्री 26 ऑक्टोंबर पासून चालू होणार आहे.
आयफोनच्या या प्री- बुकिंगच्या सुविधेमुळे ग्राहकांना या नवीन आयफोनच्या सिरिजचा आनंद घेता येणार आहे. तसेच 64 जीबीसाठी 76,900, 128 जीबी स्टोरेजसाठी 81,900 आणि 256 जीबीसाठी 91,9000 रुपये याची मुळ किंमत आहे. तर या आयफोनची तुलना iPhoneXS Max आणि iPhoneXS सोबत केली असता त्याची किंमत 1,00,000 रुपयांपासून चालू आहे.