Suicide प्रतिकात्मक प्रतिमा

Karnataka Shocker: गेल्या काही वर्षांत देशातील तरुणांमध्ये आयफोन (iPhone) खरेदी करण्याची क्रेझ वाढली आहे. सध्या भारतात आयफोन मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते आयफोन खरेदी करत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते ईएमआय (EMI) हा फोन खरेदी करत आहेत. कर्नाटकातील एका 24 वर्षीय तरुणाने EMI वर आयफोन खरेदी केला. यानंतर, जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला यावरून सुनावलं तेव्हा तरुणाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, ही घटना कर्नाटकातील बेळगाव येथील आहे. एका तरुणाला त्याच्या वडिलांनी आयफोन खरेदी केल्याबद्दल फटकारले. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. खरंतर, बेळगावमधील न्यू वैभव नगर येथील रहिवासी 24 वर्षीय मुस्तफिज अब्दुल रशीद शेखने 70 लाखांचा आयफोन खरेदी केला. त्याचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने EMI भरण्याच्या अटीवर आयफोन घेतला. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला महागड्या फोनऐवजी स्वस्त फोन खरेदी करण्यावरून फटकारले. त्यानंतर तो वडिलांवर रागावला आणि त्याच्या खोलीत गेला. (हेही वाचा - MBBS Student Dies By Suicide In Kota: 'मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही'; कोटामध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या)

संतापून घेतला गळफास -

दरम्यान, काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी त्याला खोलीतून बाहेर येण्यास सांगितले तेव्हा तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही काळ हे असेच चालू राहिले पण जेव्हा तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा कुटुंब काळजीत पडले. त्यांनी पुन्हा खोलीचा दरवाजा ठोठावला पण पुन्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. कारण, मुस्तफिज अब्दुल रशीद शेखने गळफास घेतला होता. यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा, JEE Aspirant: कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; बिहारमधील 16 वर्षीय विद्यार्थ्याची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या)

गेल्या वर्षी, इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनने एक अहवाल देखील प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतातील बहुतेक महागडे फोन EMI वर खरेदी केले जात आहेत. तसेच, एका युट्यूबरने असा दावा केला होता की भारतातील 70 टक्क्यांहून अधिक आयफोन ईएमआयवर खरेदी केले जातात. कारण लोक पैसे देऊन ते खरेदी करू शकत नाहीत.