Tata Sky ब्रॉडबॅन्डने लॉन्च केला 300Mbps स्पीड आणि 500GB डेटा असणारा धमाकेदार प्लॅन, जाणून घ्या अधिक
त्यामध्ये 300Mbps ची स्पीड आणि 500GB डेटा मिळणार आहे.
Tata Sky Limited यांची सब्सिडियरी कंपनी Tata Sky Broadband यांनी त्यांच्या एक धमाकेदार प्लॅन लॉन्च केला आहे. त्यामध्ये 300Mbps ची स्पीड आणि 500GB डेटा मिळणार आहे. दरम्यान, 500GB डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट ब्रॉडबॅन्डची स्पीड कमी होऊन 3Mbps होणार आहे. हा नवा प्लॅन काही निवडक ठिकाणी 1900 रुपये प्रतिमहा असा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.(आयफोन निर्माता Apple बनली 2 ट्रिलियन डॉलर्स मार्केट व्हॅल्यूपर्यंत पोहोचणारी पहिली अमेरिकन कंपनी)
Gizbot यांच्या रिपोर्टनुसार, टाटा स्कायच्या नव्या प्लॅनचे सब्सक्रिप्शन महिना, तीन महिने, सहा महिने आणि संपूर्ण वर्षासाठी करता येणार आहे. तसेच हा प्लॅन फ्री राउटरच्या सुविधेसह मिळणार आहे. त्याचसोबत तीन, सहा महिने आणि वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन केलेल्या ग्राहकांना फ्री इंस्टॉलेशनची सुविधा मिळणार आहे. तसेच फिक्स 500GB प्लॅनसह डेटा रोलओवरचे ऑप्शन उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
टाटा स्कायचा हा नवा प्लॅन बंगळुरु, चैन्नई, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, मुंबई, नवी दिल्ली, पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ठाण्यात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच देशातील अन्य ठिकाणी हा प्लॅन लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यापूर्वी मे महिन्यात सुद्धा 300Mbps स्पीड असणारा प्लॅन आणला होता. त्यामध्ये अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळणार आहे. या अनलिमिटेड प्लॅनची किंमत 1900 रुपये ठेवण्यात आली आहे.(Thomson यांनी भारतात 10,999 रुपये किंमतीत लॉन्च केला Make In India' Android टीव्ही)
भारतात सध्या टाटा स्काय ब्रॉडबॅन्डच्या वतीने 18 फिक्स GB ब्रॉडबॅन्ड प्लॅन उपलब्ध करुन दिला जाणार आहे. याची किंमत 950 रुपये ते 1900 रुपयांपर्यंत आहे. कंपनीकडून याच्या व्यतिरिक्त अनलिमिटेड डेटा प्लॅन ऑफर केला जात आहे. जो 25Mbps,50Mbps,100Mbps आणि 300Mbps स्पीडसह येणार आहे. हा प्लॅन महिन्याभरासाठी, तीन महिने, सहा महिने आणि वर्ष भराच्या आधारावर येणार आहे. सध्या मंथली प्लॅनमध्ये युजर्सला फ्री इंन्स्टॉलेशन, फ्री राउटर सारख्या सुविधा मिळणार नाही आहेत. परंतु सहा आणि 12 महिन्याच्या सब्सक्रिप्शनच्या प्लॅनवर 10 ते 15 टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. कंपनीचा सहा महिन्याच्या प्लॅनची किंमत 4860 रुपये, 5400 रुपये आणि 5950 रुपये आहे. तर वर्ष भराच्या प्लॅनची किंमत 9180 रुपये, 10,200 रुपये आणि 11,200 रुपये आहे.