Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता

जर स्टारलिंकने भारतात प्रवेश केला, तर इतर दूरसंचार ऑपरेटर्ससाठी ती कठीण स्पर्धा असू शकते. अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिल्यानंतर, स्टारलिंकला सॅटेलाइट (GMPCS) सेवा परवाना ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन जारी केला जाईल.

Internet (PC - @ians_india)

Starlink Receives Government Approval: येत्या काही दिवसांत टेस्लाचे (Tesla) सीईओ एलोन मस्क (Elon Musk) भारत भेटीला येणार आहेत. यावेळी त्यांची पीएम मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहेत. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नियोजित भेटीच्या काही दिवस आधी, एलोन मस्क यांचा उपग्रह इंटरनेट उपक्रम स्टारलिंकला (Starlink) दूरसंचार मंत्रालयाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. भारतीय वापरकर्ते बऱ्याच काळापासून याची वाट पाहत होते. आता लवकरच स्टारलिंक भारतात प्रवेश करू शकते.

स्टारलिंकची फाइल सध्या दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे असल्याचे एका वृत्तात सांगण्यात आले आहे. अश्विनी वैष्णव सुरक्षेशी संबंधित काही मुद्द्यांवर गृह मंत्रालयाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा करत आहेत.

अहवालानुसार, जेव्हा स्टारलिंकलाला सर्व मान्यता मिळतील तेव्हाच स्टारलिंकलाला सॅटेलाइट सेवेद्वारे भारतात सेवा देण्यासाठी ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशनचा परवाना मिळेल. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असेही म्हटले आहे की, स्टारलिंकचे व्यावसायिक भाग जसे की नेट वर्थ आणि परदेशी गुंतवणूक तपासण्यात आली आहे. हे अर्ज मार्गदर्शक तत्त्वांनुसार असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Tesla Lays Off: टेस्लामध्ये होणार नोकर कपात; जागतिक स्तरावर 10 टक्के कर्मचाऱ्यांना दाखवला जाणार बाहेरचा रस्ता)

अहवालातील सूत्रांच्या हवाल्याने पुढे म्हटले आहे की, परवान्याच्या अटींनुसार आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक गोष्टी तपासल्या गेल्या आहेत. याशिवाय कंपनीने मालकी हक्काची घोषणाही सादर केली आहे. मालकीच्या संदर्भात, सरकारला हे सुनिश्चित करायचे होते की, स्टारलिंकचा भारताशी जमीन सीमा असलेला कोणताही देश भागधारक नाही. यासोबतच केवायसी तपशील आणि भारतीय वापरकर्त्यांची ग्राहक माहिती देशाबाहेर जाऊ नये, असेही मंत्रालयाने बंधनकारक केले आहे.

याशिवाय, सरकारला कंपनीकडून एक हमी देण्याची गरज आहे की, इंडियन एअर आणि वॉटर स्पेसचे ट्राफिक हे केवळ लोकल गेटवेवरच संपेल. तसेच, सॅटेलाइटमधून येणारा डेटा बीम फक्त भारतातच यायला हवा. यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही कंपनीने अधिकाऱ्यांना दिले आहे. स्टारलिंक सध्या अमेरिकेत सेवा देत आहे. जर स्टारलिंकने भारतात प्रवेश केला, तर इतर दूरसंचार ऑपरेटर्ससाठी ती कठीण स्पर्धा असू शकते. अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिल्यानंतर, स्टारलिंकला सॅटेलाइट (GMPCS) सेवा परवाना ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन जारी केला जाईल, जो भारतात उपग्रह संप्रेषण सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. वनवेब (भारती एअरटेलचे सुनील मित्तल समर्थित) आणि मुकेश अंबानीच्या जिओ (लक्झेंबर्ग-आधारित एसइएससह भागीदारीमध्ये) यांना आधीच असे परवाने देण्यात आले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif