Starlink Broadband Service: पुढच्या वर्षी Elon Musk भारतामध्ये सुरु करणार आपली इंटरनेट सेवा; Jio आणि Airtel शी स्पर्धा
त्या बदल्यात ते प्रति सेकंद 50-150 मेगाबिट्सचा स्पीड देत आहेत. भार्गव म्हणाले की, ज्या ग्रामीण संसदीय मतदारसंघात अधिक मागणी येईल, तिथे ही सेवा सुरू केली जाईल
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कने भारताच्या इंटरनेट विश्वात खळबळ उडवण्यासाठी तयारी केली आहे. त्यांची उपग्रह कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली इंटरनेट सेवा सुरू करत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, स्टारलिंक भारतातील 10 ग्रामीण लोकसभा मतदारसंघात आपली सेवा सुरू करेल. आतापर्यंतच्या योजनेनुसार, कंपनी डिसेंबर 2022 पासून भारतात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करेल. कंपनी सुरुवातीला 2 लाख टर्मिनलसाठी सरकारची मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेत आहे.
असे मानले जाते की, कंपनीचे अधिकारी या संदर्भात लोकसभा सदस्य, मंत्री आणि महत्वाचे अधिकारी यांच्याशी लवकरच एक आभासी बैठक घेतील. स्टारलिंक ही एलोन मस्कची उपग्रह ब्रॉडबँड कंपनी आहे. याच्या मदतीने डोंगराळ, ग्रामीण आणि दुर्गम भागात कुठेही इंटरनेट सर्व्हिस देता येते. स्टारलिंक इंडियाचे प्रमुख संजय भार्गव म्हणाले की, या महिन्यात ते खासदार, अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेऊ शकतात. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी असेही म्हटले आहे की स्टारलिंकच्या ब्रॉडबँड कनेक्शनसाठी 5000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.
ब्रॉडबँड सेवेसाठी स्टारलिंक 99 डॉलर म्हणजेच सुमारे 7350 रुपये प्रति ग्राहक दर आकारत आहे. त्या बदल्यात ते प्रति सेकंद 50-150 मेगाबिट्सचा स्पीड देत आहेत. भार्गव म्हणाले की, ज्या ग्रामीण संसदीय मतदारसंघात अधिक मागणी येईल, तिथे ही सेवा सुरू केली जाईल. अशाप्रकारे स्टारलिंक थेट एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि वनवेबशी स्पर्धा करेल. भारती एअरटेल बँकिंग कंपनी OneWeb मे 2022 पासून भारतात आपली सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा: Apple ची खास ऑफर; 7 ऑक्टोबर रोजी iPhone 12 Mini किंवा iPhone 12 खरेदी केल्यास AirPods मिळतील फ्री)
दुसरीकडे, सरकार पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5G स्पेक्ट्रम लिलावाचा विचार करत आहे. यासाठी दूरसंचार विभागाने ट्रायकडून सूचनाही मागवल्या आहेत. दरम्यान, गेल्या एक वर्षापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी दोन, टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांच्यामध्ये सतत स्पर्धा सुरु आहे. आता टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचा पराभव करून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.