Sri Lanka accepts UPI-based Payments: भारतीय आता France, UAE, Singapore पाठोपाठ श्रीकंकेमध्ये करू शकणार यूपीआय द्वारा व्यवहार

ज्यामध्ये ग्राहकांना मोबाईलच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक व्यवहार करता येतो. यामध्ये Virtual Payment Address चा वापर केला जातो.

(Photo Credits: AIR/ Twitter)

भारताची Unified Payments Interface टेक्नॉलॉजी आता श्रीलंकेमध्येही युजर्सना वापरता येणार आहे. म्हणजेच आता श्रीलंकेमध्ये फिरायला जाणार्‍या भारतीयांना तेथे यूपीआयचा वापर करून अर्थव्यवहार करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आज भारतभेटी वर आलेल्या Sri Lankan President Ranil Wickremesinghe यांनी पंतप्रधानांची भेट घेत या करारावर स्वाक्षरी देखील केली आहे. UPI payments system ही भारतातील लोकप्रिय रिटेल डिजिटल पेमेंट व्यवस्था आहे.

भारतीयांना श्रीलंकेपूर्वी यूपीआय द्वारा फ्रांस, यूएई आणि सिंगापूर मध्ये व्यवहार करता येत होता. त्यासाठीचे करार झालेले आहेत. UPI ही भारतातील मोबाईल बेस्ड फास्ट पेमेंट सिस्टीम आहे. ज्यामध्ये ग्राहकांना मोबाईलच्या माध्यमातून तात्काळ आर्थिक व्यवहार करता येतो. यामध्ये Virtual Payment Address चा वापर केला जातो. How To Use UPI Lite: यूपीआय लाईट कसे वापरावे? App, फिचर आणि व्यवहार याबाबत घ्या जाणून .

फिनटेक इनोव्हेशनसाठी भारत सर्वात वेगाने वाढणारी इकोसिस्टम म्हणून उदयास येत आहे आणि भारताच्या डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या जागतिकीकरणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

UPI चे फायदे फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून इतर देशांनाही त्याचा लाभ मिळावा यावर भारत सरकारचा मुख्य भर आहे.UPI पेमेंट प्रणालीची लोकप्रियता लक्षात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतात येणा-या सर्व प्रवाशांना त्यांच्या व्यापारी पेमेंटसाठी UPI वापरण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला.