Reon Pocket Wearable Air Conditioner : सोनी कंपनीने विक्रीसाठी खुला केला वेअरेबल एसी; जाणून घ्या त्याची खास वैशिष्ट्य!
आता हा एसी लॉन्च देखील करण्यात आला आहे. बाजारात ग्राहकांसाठी तो उपलब्ध देखील करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात घामांच्या धारांमध्ये भिजताना अनेकदा तुमच्या मनात आलं असेल एखादा चालता फिरता एसी असला असता तर बरं झालं असतं. दरम्यान आता तुमच्या मनातील ही गोष्ट सत्याय उतरली आहे. सोनी (Sony) कंपनीने चक्क वेअरबेल पॉकेट एसी बनवण्याची किमया साधली आहे. आता Reon Pocket Wearable Air Conditioner हा एसी लॉन्च देखील करण्यात आला आहे. बाजारात ग्राहकांसाठी तो उपलब्ध देखील करण्यात आला आहे.
सोनी कंपनीचा वेअरेबल एसी तुम्हांला कपड्यांसोबत घालता येतो आणि उन्हाच्या कडाक्यात तुम्हांला थंडगार ठेवतो. दरम्यान Reon Pocket एसीची किंमत 13,000 जापानी येन म्हणजेच भारतामध्ये अंदाजे नऊ हजार रूपयांच्या आसपास आहे. कपड्यांच्या आत जाणार्या या एसीची सध्या जपानमध्ये विक्री सुरू झाली आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट्स अमेझॉन सोबत सोनीच्या ऑनलाईन स्टोअर वर देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
सोनी वेअरेबल एसीची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याचा आकार अॅपलच्या मॅजिक माऊस इतका लहान आहे. त्यामुळे हाताच्या तळव्यावर तो अगदी सहज राहतो. त्याचा उत्तमप्रकारे वापर करता यावा यासाठी खास टीशर्ट्स देखील बनवण्यात आले आहेत. त्याम्मध्ये एक फॅन देण्यात आला आहे. त्याचा वापर कपड्यांमधील गरम हवा बाहेर फेकण्यास मदत करेल. हा एसी अॅन्ड्राईड, आयओएस स्मार्टफोन सोबतदेखील लिंक करता येऊ शकतो. अॅपच्या मदतीने त्याला कंट्रोल केलं जाऊ शकतं.
Tamil Nadu Madurai येथे विकला जातोय मास्कच्या आकाराचा पराठा, कोरोना रवा डोसा आणि बोंदा; पाहा व्हिडिओ - Watch Video
सोनी कंपनीचा दावा आहे की एसीची बॅटरी चार्ज केल्यानंतर 2-4 तास बॅकअप देते. याला पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान 2 तासांचा वेळ लागतो. उन्हाळ्यात एसी तर हिवाळ्यात हिटर म्हणून देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत देखील वापर होऊ शकतो.