सोनीने लॉन्च केला हाय झूम कॅमेरा ; हे आहेत खास फिचर्स

हा जगातील सर्वात लहान बॉडी असलेला कॅमेरा आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Facebook)

सोनी इंडियाने हाय जूम सायबर शॉट लाईनचा विस्तार करत डिएससी डब्ल्यूएक्स 800 हा नवाकोरा कॅमेरा लॉन्च केला. 29 ऑक्टोबरपासून हा विक्रीसाठी उपलब्ध होईल. डिएससी डब्ल्यूएक्स 800 ची किंमत 34,990 रुपये आहे. हा जगातील सर्वात लहान बॉडी असलेला कॅमेरा आहे, असा दावा कंपनीने केला आहे. याची झूम रेंज 24 एमएम ते 720 एमएम इतकी आहे. यात सुपर टेलीफोटो लेन्स लावण्यात आली आहे.

कंपनीनुसार, यात बॉयोन्ज एक्स इमेज प्रोसेसिंग इंजिनसोबत फ्रंट एंड एलएसआय देण्यात आले आहे. जे हाय स्पीड कंटीन्यूअस शूटिंग 10 फ्रेम प्रति सेकंदच्या स्पीडने काम करतो. याची बफर लिमीट 155 फोटोंची आहे. यात 180 डिग्री टिल्टेबल एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामुळे सेल्फी काढणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर कनेक्टीव्हीटीसाठी ब्लूटुथ देण्यात आलं आहे. भारतीय बाजारात हा कॅमेरा सोनी सेंटर्स, अल्फा फ्लॅगशिप स्टोर आणि प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स स्टोर्सवर उपलब्ध होईल.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये

Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अ‍ॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

Advertisement

TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement