SMS Scams: सावधान! Google Play Store वरुन गुगलने हटवली 150 Mobile Apps, तुमच्या मोबाईलमध्ये आहेत?
गुगलने नुकतीच आपल्या प्ले स्टोरवरुन जवळपास 150 मोबाईल अॅप हटवली आहेत. या मोबाईल अॅपवरुन लोकांना पैसे कमावण्याचे अमिष दाखवले जात होते आणि पुढे त्यांची फसवणूक होत असे. अशा 150 मोबाईल अॅपवर गूगलने कारवाई केली आहे.
Google, Google Play Store: आपल्या मोबाईलमध्ये कोणकोणती अॅप्लीकेशन्स आहेत याबाबत आपल्याला माहिती असायला हवी. इतकेच नव्हे तर ती सातत्याने अद्ययावतही करायला हवी. अनेकदा खूप चर्चेत आणि लोकप्रिय असलेली अॅपही धोकादायक आणि फेक असतात. अशी फेक मोबाईल अॅप्लीकेशन्स (Fake Mobile App) गूगल आपल्या प्ले स्टोर (Google Play Store) वरुन ही अॅप हटवते. प्राप्त माहितीनुसार गुगलने नुकतीच आपल्या प्ले स्टोरवरुन जवळपास 150 मोबाईल अॅप हटवली आहेत. या मोबाईल अॅपवरुन लोकांना पैसे कमावण्याचे अमिष दाखवले जात होते आणि पुढे त्यांची फसवणूक होत असे. अशा 150 मोबाईल अॅपवर गूगलने कारवाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, Google Play Store नावाच्या अॅप स्टोरवरुन Google ने 150 पेक्षाही अधिक अॅप हटवली आहेत. प्ले स्टोरवर सुमारे 150 मॅलेशियस SMS स्कॅम अॅप UltimaSMS नावाच्या एका मोहिमेचा भाग होती. ज्यात मॅलशियस प्रोग्राम व्हिक्टिमला महागडी प्रीमियम SMS सेवा देण्यासाठी साईनअप करायला सांगत असत. त्यानंतर त्यावरुन युजर्सला पैसे कमावून देण्याचे अमिष दाखवले जात असे. मात्र, पैसे कमाविण्याऐवजी उलट युजर्सलाच आर्थिक फटका बसत असे. ते फसवणुकीची शिकार होत असत. (हेही वाचा, Google Meet ला मिळाले नवे अपडेट, आता मिटिंग होस्टला करता येणार 'हे' बदल)
सिक्योरिटी सर्विस प्रोवाइडर Avast यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अॅपला Google Play Store वरुन 10.5 वेळा डाऊनलोड करण्यात आले. अंदाज व्यक्त केला जात आहे की, सुमारे १० मिलियन यूजर्स या अॅपची शिकार झाले आहेत. रिपोर्टनुसार, UltimaSMS बाबत असेही सांगितले जात आहे की, हा प्रकार केवळ भारत या एकट्या देशापुरता मर्यादीत नाही. जगभरातील इतरही देशातील अनेक नागरिकांना याचा मोठाच बसला आहे. इजिप्त, सऊदी अरब, पाकिस्तान, संयुक्त अरब अमीरात, तुर्की, ओमान, कतर, कुवैत, अमेरिका यांसारख्या देशातील नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. या ऑनलाइन फ्रॉडची सुरुवात 2021 मध्ये झाली होती. हॅकर्स आणि सायबरे गुन्हेगारांनी कीबोर्ड, क्यूआर कोड स्कॅनर, व्हिडिओ आणि इमेज एडीटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमरा फिल्टर आणि काही गेम अॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली होती.
Google Play Store वरुन जेव्हा एखादा युजर्स अशी एॅप डाऊनलोड करतो तेव्हा त्याचे लोकेशन, IMEI नंबर आणि फोन नंबर तपासला जातो. जेणेकरुन स्कॅम करण्यासाठी स्थानिक भाषा, एरिया कोड आदींचा वापर करण्यात येईल. दरम्यान, मोबाईल अॅप आणि डिजिटल साक्षरतेचे अभ्यासक सांगतात की, नागरिकांनी फोनचा वापर सावधानतेने करावा. कोणतेही अॅप ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)