IPL Auction 2025 Live

SmilePay Facial Payment System: रोख रक्कम, कार्ड किंवा मोबाईल विसरा, आता केवळ चेहरा दाखवून होणार पेमेंट; फेडरल बँकेने सुरु केली ‘स्माईल पे’ नावाची व्यवहार प्रणाली

हे स्कॅनिंग UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशन सिस्टमशी जोडलेले आहे, जे ग्राहकाची ओळख सत्यापित करते. चेहऱ्याची ओळख झाल्यावर तुमच्या बँक खात्यातून पेमेंट आपोआप केले जाते.

Facial Payment System | प्रातिनिधिक प्रतिमा | Photo Credit : Pixabay

SmilePay Facial Payment System: कार्डचा वापर न करता, मोबाईलला स्पर्श न करता, फक्त तुमच्या चेहऱ्याच्या मदतीने पेमेंट करण्याची कल्पना करा, थोड अवघड वाटतेय ना? मात्र सायन्स फिक्शनसारखे वाटणारे हे तंत्रज्ञान आता वास्तवात उतरले आहे. फेडरल बँकेने ‘स्माईल पे’ (SmilePay) ही नवीन आणि अनोखी पेमेंट प्रणाली सुरू केली आहे, ज्याद्वारे केवळ चेहऱ्याच्या ओळखीद्वारे पेमेंट करणे शक्य होणार आहे. म्हणजेच कार्ड, रोख रक्कम किंवा मोबाईलची गरज विसरा, आता तुमचा चेहराच तुमची पेमेंट पद्धत असेल.

हे तंत्रज्ञान केवळ जलद आणि सोपेच नाही तर अधिक सुरक्षित देखील आहे. ‘स्माईल पे’ तंत्रज्ञानाने पेमेंट करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये ग्राहकाचा चेहरा ओळखला जातो आणि काही सेकंदात पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

ही प्रणाली सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे सांगत, फेडरल बँकेने दावा केला आहे की, हे तंत्रज्ञान UIDAI च्या BHIM Pay च्या आधार आधारित चेहरा प्रमाणीकरण प्रक्रियेवर आधारित आहे. या नवीन पेमेंट प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, यामुळे केवळ ग्राहकांचाच नाही तर व्यापाऱ्यांचाही वेळ वाचणार आहे. ‘स्माईल पे’ ही UIDAI च्या भीम आधार पेच्या प्रगत फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिली पेमेंट प्रणाली आहे. (हेही वाचा: Reliance AGM 2024: आता Google Drive, iCloud शी स्पर्धा करण्यासाठी येत आहे Jio AI-Cloud; वापरकर्त्यांना मिळणार 100 जीबी विनामूल्य स्टोरेज, जाणून घ्या सविस्तर)

स्माईल पेद्वारे पेमेंट करताना, ग्राहकाचा चेहरा एका खास कॅमेऱ्याने स्कॅन केला जातो. हे स्कॅनिंग UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशन सिस्टमशी जोडलेले आहे, जे ग्राहकाची ओळख सत्यापित करते. चेहऱ्याची ओळख झाल्यावर तुमच्या बँक खात्यातून पेमेंट आपोआप केले जाते. फेशियल ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेमेंट प्रक्रियेमध्ये, तुमचा चेहरा हाच तुमचा पासवर्ड आहे, ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी होते.