Smartphone Gift For Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी निवडा 'हे' 10 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बजेट स्मार्टफोन 

आपल्या बहिणीला तुम्ही मोबाईल देण्याच्या विचारात असाल आणि कोणता मोबाईल घेऊ यामध्ये गोंधळ होत असेल तर तुमची ही समस्या आज आम्ही सोडवणार आहोत.

Smartphone Gift Idea ( Photo- YouTube)

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो यंदा 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. हा दिवस खास भावा-बहिणीचा असतो. या शुभ प्रसंगी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.हा सण भाऊ आणि बहिणीच्या भावनिक बंधनाचे प्रतीक मानले जाते. बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ बहिनीला एखादी भेटवस्तू देतो अशी प्रथा आहे. यंदा आपल्या बहिणीला तुम्ही मोबाईल देण्याच्या विचारात असाल आणि कोणता मोबाईल घेऊ यामध्ये गोंधळ होत असेल तर तुमची ही समस्या आज आम्ही सोडवणार आहोत. पाहूयात बहिणीला गिफ्ट देण्यासाठी अगदी तुमच्या बजेट मध्ये बसणारे स्मार्ट फोन कोणते आहेत. (Raksha Bandhan 2021 Gift Idea: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'हे' गिफ्ट्स देऊन करा खुश)

Realme Narzo 30 A 

Realme Narzo 30 A  या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला Android 10 च्या सपोर्टसह 6.5-इंच HD + डिस्प्ले मिळत आहे, याशिवाय तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच देखील मिळेल. तसेच या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 85 प्रोसेसर मिळत आहे, जो फोनमध्ये 4 जी रॅमच्या सपोर्टसह दिला जातो. या फोनची किंमत 9999 आहे.

POCO C3

Xiaomi Poco C3 6.53-इंच HD+ डिस्प्लेसह येईल ज्याचे रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आणि वर वॉटरड्रॉप नॉच असेल जे 20: 9 अस्पेक्ट रेशो देण्यास मदत करेल. फोनला ड्युअल टोन फिनिश आहे आणि हा फोन आर्कटिक ब्लू, मॅट ब्लॅक आणि लाइन ग्रीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Poco C3 मध्ये MediaTek Helio G35 चिपसेट असेल जे ऑक्टा-कोर CPU आणि PowerVR GE8320 ग्राफिक्ससह जोडले जाईल. हा फोन सध्या फ्लिपकार्ट , अमेझोन सारख्या प्लॅटफॉर्मवर ऑफर सह मिळत आहे.

Redmi 9 Power

या टॉप सेलिंग स्मार्टफोनमध्ये 48 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि 8 एमपी फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. तसेच 6.53 इंच एचडी मल्टीटच कॅपेसिटिव्ह टच स्क्रीन, 4 जीबी रॅम, 64 जीबी एक्स्पांडेबल स्टोरेज आणि 6000 एमएएच बॅटरी आहे. हा सर्वोत्तम स्पेसिफिकेशन स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये पूर्णपणे फिट होईल.

Moto G10 Power

मोटो जी 10 पॉवर हा बॅटरी फोकस्ड फोन आहे. हा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 एसओसी द्वारे संचालित आहे. स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्यात असलेली 6,000mAh ची बॅटरी. फोनमध्ये 48MP चा रियर कॅमेरा आहे, जो 8MP अल्ट्रावाइड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या फ्रंट साईडला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे.

Samsung Galaxy M02 

10000 पेक्षा कमी बजेटच्या या स्मार्टफोनमध्ये 13MP + 2MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. 10000 पेक्षा कमी बजेटच्या या स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंच LCD V कट डिस्प्ले आहे. यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे.