Slovakia मधील KleinVision कंपनीने विकसित केली AirCar; 3 मिनिटांत कारचे विमानात रुपांतर (Watch Video)
या गाडीचे रुपांतर एका एअरक्रॉफ्ट मध्ये होऊ शकते हे या गाडीचे वैशिष्ट आहे. स्लोव्हाकिया मध्ये या गाडीचे टेस्टिंग करताना अवघ्या तीन मिनिटांमध्ये गाडीचे रुपांतर एअरक्रॉफ्टमध्ये झाले.
स्लोव्हाकिया (Slovakia) मध्ये नुकत्याच एका अनोख्या गाडीचे टेस्टिंग करण्यात आले. या गाडीचे रुपांतर एअरक्रॉफ्ट (Aircraft) मध्ये होऊ शकते, हे या गाडीचे वैशिष्ट आहे. स्लोव्हाकिया मध्ये या गाडीचे टेस्टिंग करताना अवघ्या तीन मिनिटांमध्ये गाडीचे रुपांतर एअरक्रॉफ्टमध्ये झाले. विशेष म्हणजे सुमारे दीड हजार फूट उंचीवरुन या गाडीचे टेस्टिंग करण्यात आले. या गाडीला 'एअरकार' (AIrCar) असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी KleinVision या कंपनीने बनवलेली असून या अनोख्या गाडीचे टेस्टिंग स्लोव्हाकिया मधील पिस्टनी विमानतळावर (Piestany Airport) करण्यात आले. (SkyDrive Flying Car: जपानी कंपनी निर्मित हवेत उडणाऱ्या गाडीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण, Watch Video)
ही एअरकार हवेत आणि जमिनीवर चालू शकते. या गाडीचे वजन अंदाजे 1,100 किलो इतके आहे. ही गाडी 200 किमी इतके वजन पेलवू शकते. या कारबद्दल KleinVision कंपनीने सांगितले की, "फ्लाईंग कार्स जनरेशनमधील सर्वात लेटेस्ट मॉडल क्लेनविजन कंपनीने बनवले असून ही कार अवघ्या तीन मिनिटांत एअरक्रॉफ्टमध्ये रुपांतरीत होते. लोकांना प्रवास करण्यासाठी किंवा व्यावसायिक गोष्टींसाठीही या कारचा उपयोग केला जाऊ शकतो."
पहा व्हिडिओ:
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या गाडीमध्ये BMW चे 1.6l इंजिन असून ही गाडी 140HP चा आऊटपूट देऊ शकते. या एअरकारने 1000 किमी पर्यंतचा प्रवास करता येईल. तसंच या कारला 18 लीटर प्रती तास इतके इंधन लागते. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये शांघाय येथे झालेल्या China International Import (CIIE) मध्ये या एअरक्रॉफ्टचे फ्लाईंग प्रोटोटाईम लोकांना दाखवण्यात आले होते.