Shubha Deepavali 2019 WhatsApp Stickers: दीपावलीच्या शुभेच्छा आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देण्यासाठी मोफत डाऊनलोड कशी कराल?

दिवाळीच्या शुभेच्छा मराठमोळ्या व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्यामाध्यमातून देण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ती मोफत डाऊनलोड कशी करायची हे तुम्हांला ठाऊक आहे का?

Diwali WhatsApp Stickers (File Photo)

Happy Diwali Marathi WhatsApp Stickers:  यंदा दिवाळीचा सण 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये वसूबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असे वेगवेगळे सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाला तुम्हांला तुमच्या जवळच्या, प्रिय व्यक्तींना भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देणं शक्य नाही. पण आज 21 व्या शतकात आपण मोबाईल इंटरनेट मुळे एकमेकांशी जोडले गेलो आहोत. जगाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत सार्‍यांना जोडणार्‍या डिजीटल मीडियाच्या युगात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक सारख्या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करून तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळी पाडव्याच्या शुभेछ्हा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता. व्हॉट्सअ‍ॅप हे आज्काल जगात सर्वत्र लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. वर्षभरापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर खास स्टिकर्सच्या (WhatsApp Stickers) माध्यमातून शुभेच्छा देण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मग पहा यंदा दीपावलीच्या शुभेच्छा मराठमोळ्या व्हॉट्सअ‍ॅप स्टीकर्सच्या माध्यमातून कसा पाठवू शकता? नक्की वाचा:  Happy Diwali 2019 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा नरक चतुर्दशीचा सण!

दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हांला मराठी संदेश, मेसेज, शुभेच्छापत्र, ग्रीटींग्सच्या माध्यमातून देण्याचा नेहमीचा पर्याय कंटाळवाणा वाटत असेल तर खास मराठी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा पहा कशा पाठवाल? नक्की वाचा:  Happy Diwali 2019 Messages: दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, मेसेज, ग्रीटींग्स आणि शुभेच्छापत्रं!

WhatsApp वर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी काय पर्याय ?

व्हॉट्सअ‍ॅप वर थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही अनेक स्टिकर्स डाऊनलोड करू शकता. केवळ ती स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅड करावी लागतात. मग थेट व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही शेअर करू शकता.

शुभ दीपावली Android Stickers मोफत कशी डाऊनलोड कराल ?

1. सर्वात प्रथम तुमच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट वर्जन असणं आवश्यक आहे. त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप अपडेट करून घ्या. त्यानंतर Google Play Store च्या सर्च बॉक्समध्ये ‘Shubh Deepavali Stickers’ असं सर्च करा. इथे पहा काही खास मराठमोळी स्टिकर्स.

2. ‘Deepavali Stickers’, 'Diwali Stickers' असं सर्च केल्यानंतर तुम्हांला अनेक पर्याय मिळू शकतात. तुम्हांला आवडेल त्या स्टिकर्स पॅकवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा.

3.इंस्टॉल केल्यानंतर वापरण्यासाठी त्या पॅकला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅड करणं आवश्यक आहे. याकरिता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पॅक अ‍ॅड करण्यासाठी केवळ '+' बटणावर क्लिक करा.

4.तुमचा स्टिकर्स पॅक अ‍ॅड झाल्यानंतर Emoji आणि GIF tab मध्ये तुम्हांला Diwali 2019 Stickers मिळू शकतात. नक्की वाचा:  WhatsApp Stickers Update : '8' सोप्या स्टेप्समध्ये कोणताही फोटो बनू शकेल आता Sticker.

तुम्हांला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स पॅकमध्ये असलेले पर्याय आवडत नसतील तर तुम्ही स्वतःची क्रिएटीव्हीटी वापरून देखील कस्टमाईज्ड स्टिकर्स बनवू शकाल. यामध्ये फोटो देखील स्टिकर्समध्ये बदलू शकता. दिवाळी हा सण देशभरात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. मग तुमच्याकडे ती कोणत्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते क? आमहांला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच लेटेस्टली परिवाराकडून तुम्हांला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! हॅप्पी दिवाली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now