ShareIt सारखे नवे अ‍ॅप Google लवकरच घेऊन येणार, स्मार्टफोन्सना फाइल शेअरिंगसाठी मिळणार दमदार ऑप्शन

कारण भारत सरकारने नुकत्याच चीनी अॅपवर भारतात बंदी घातली असल्याने युजर्सला त्याचा वापर करता येणार नाही आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

स्मार्टफोनसाठी एखादी फाईल शेअर करण्यासाठी वापरण्यात येणारे ShareIt हे अॅप सध्या भारतात बॅन करण्यात आले आहे. कारण भारत सरकारने नुकत्याच चीनी अॅपवर भारतात बंदी घातली असल्याने युजर्सला त्याचा वापर करता येणार नाही आहे. बॅन करण्यात आलेल्या अॅपमध्ये शेअरइट ते टिकटॉक सारख्या शॉर्ट व्हिडिओ मेकिंगचा समावेश आहे. त्यामुळे आता युजर्स स्मार्टफोनमधील एखादी फाइल शेअर करण्यासाठी ऑप्शन शोधत आहेत. पण युजर्सला काळजी करण्याची काहीज गरज नाही. कारण गुगल लवकरच शेअरइट सारखे एक नवे अॅप घेऊन येणार आहे. त्यामुळे युजर्सला अवघ्या काही मिनिटांतच फाइल्स शेअर करता येणार आहेत.

गुगलने याबाबत अधिकृत माहिती देत असे म्हटले आहे की, Nearby Share असे त्याचे नाव असणार आहे. हे अॅप आयफोनला देण्यात आलेल्या AirDrop ऑप्शन सारखे काम करणार आहे. याच्या मदतीने युजर्सला एका डिवाइसमधून दुसऱ्या डिवाइसमध्ये फाइल शेअर करता येणार आहे. या अॅपबाबत बीटा टेस्टिंग सु्द्धा सुरु करण्यात आली आहे. (भारतात TikTok बॅन केल्यानंतर Moj व्हिडिओ अ‍ॅप लोकप्रिय, 10 लाखांपेक्षा अधिक युजर्सने केले डाऊनलोड)

सर्च इंजिन कंपनी गुगलकडून नवे फिचर Android6 आणि त्यानंतरच्या सर्व डिवाइसेससाठी मिळणार आहे. AirDrop सारखे हे फिचर काम करणार असून अगदी सहजपणे फाइल शेअर करता येणार आहे. गुगलचे हे नवे अॅप  अॅन्ड्रॉइड युजर्सला एक खास ऑप्शन सुद्धा देणार आहे. अॅन्ड्रॉइड पोलीस यांच्या रिपोर्टनुसार, फोटो ते व्हिडिओसह लिंक्स सुद्धा या अॅपच्या माध्यमातून युजर्सला शेअर करता येणार आहे. (Elyments App Launched: श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग ने बनवलं पहिलं भारतीय सोशल मीडिया नेटवर्किंग अ‍ॅप ‘इलायमेंट्स’)

युजर्स याचे बीटा वर्जन ट्राय करता येणार आहे. त्यासाठी गुगल प्ले सर्विसमध्ये जाऊन बीटा टेस्टरच्या अंतर्गत साइन-अप करावे लागणार आहे. त्यानंतर Quick अपडेट नंतर युजर्सला शेअर शीट येथे Nearby Share चे ऑप्शन मिळणार आहे.