Total Solar Eclipse: 12 ऑग़स्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार का? जाणून घ्या

12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेनमधून दिसणार आहे, मात्र भारतात रात्रीची वेळ असल्याने हे ग्रहण दिसणार नाही. जाणून घ्या ग्रहणाची वेळ, मार्ग आणि पुढील ग्रहणांबाबत माहिती.

Solar Eclipse | (Photo Credit : X)

यंदाच्या वर्षातील सर्वात महत्त्वाच्या खगोलीय घटनांपैकी एक म्हणजे 12 ऑगस्ट 2026  रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse). हे ग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर स्पेन आणि पोर्तुगालच्या ईशान्य भागातून पूर्णपणे दिसणार आहे. मात्र भारतीय उपखंडात या वेळी रात्र असल्याने हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. नासाच्या माहितीनुसार, हे ग्रहण ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर रशिया, अटलांटिक महासागर, स्पेन आणि पोर्तुगालच्या एका छोट्या भागावरून जाईल. उत्तर गोलार्धातील इतर अनेक भागांत, म्हणजे अमेरिकेचा उत्तर भाग, बहुतांश कॅनडा, बहुतांश युरोप आणि वायव्य आफ्रिकेतून खंडग्रास (आंशिक) सूर्यग्रहण दिसेल.

भारतातून का दिसणार नाही ग्रहण?

12 ऑग़स्टचे खग्रास सूर्यग्रहण भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्रीच्या सुमारास घडणार आहे. त्यामुळे भारतीय उपखंडात या काळात सूर्यच आकाशात नसल्याने ग्रहण पाहणे शक्य होणार नाही. याचाच परिणाम म्हणजे भारतात या ग्रहणाशी संबंधित सुतक काळही लागू होणार नाही, त्यामुळे कोणतेही धार्मिक निर्बंध किंवा मंदिरे बंद ठेवण्याची गरज नसेल. भारतीय खगोलप्रेमींना हे ग्रहण थेट पाहता येणार नसले तरी, नासा आणि युरोपियन अवकाश संस्थांकडून याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

युरोपमध्ये शतकातील दुर्मिळ संधी

स्पेनसाठी हे ग्रहण विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. 1905 नंतर प्रथमच स्पेनमध्ये खग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळत आहे. स्पेनमध्ये सूर्यास्ताच्या वेळी हे ग्रहण दिसेल, त्यामुळे सुमारे 1 मिनिट 500 सेकंद इतका खग्रास काळ अनुभवता येईल. आइसलँडसाठीही ही घटना ऐतिहासिक आहे, कारण तेथे 1954 नंतर प्रथमच खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

अ कोरुन्या, वालेन्सिया, सारागोसा, पाल्मा आणि बिल्बाओ या स्पॅनिश शहरांमधून ग्रहण पूर्णपणे दिसेल, मात्र माद्रिद आणि बार्सिलोना ही शहरे खग्रास पट्ट्याच्या बाहेर राहतील. डब्लिन, रोम, लंडन, ब्रुसेल्स, ॲम्स्टरडॅम, पॅरिस आणि लिस्बन यांसारख्या शहरांमधून खंडग्रास ग्रहण वेगवेगळ्या प्रमाणात दिसेल. लिस्बनमध्ये सूर्याचा सुमारे ७०-८० टक्के भाग झाकला जाईल, तर माद्रिदजवळ हे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असेल. ‘Smiley Face’ Planetary Alignment Pics: खगोलप्रेमींना दिसला आज शुक्र, शनि आणि चंद्रकोराच्या संयोगाने खास 'स्माईली फेस' नजारा. 

पर्सिड उल्कावर्षावाचा योगायोग

या ग्रहणाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे त्याच दिवशी पर्सिड उल्कावर्षावाचा कळस असणार आहे. खग्रास पट्ट्यात असलेल्या निरीक्षकांना ग्रहणाच्या वेळी आकाशात उल्का पडताना दिसण्याची शक्यता आहे. तसेच या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूपासून (पेरिजी) अवघ्या दोन दिवसांनी असल्याने, त्याचा आकार तुलनेने मोठा दिसेल.

भारतीयांसाठी पुढील संधी कधी?

भारतातील खगोलप्रेमींसाठी दिलासादायक बाब म्हणजे पुढील वर्षी, म्हणजे 2 ऑगस्ट 2027 रोजी उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून एक खग्रास सूर्यग्रहण जाणार आहे. हे ग्रहण भारताच्या पश्चिम आणि वायव्य भागांतून खंडग्रास स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे. जैसलमेर, भुज आणि मुंबईसारख्या शहरांतील नागरिकांना सूर्यास्तापूर्वी चंद्राने सूर्याचा काही भाग झाकलेला पाहता येऊ शकतो.

भारतातून पूर्ण खग्रास सूर्यग्रहण दिसण्यासाठी मात्र बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण तज्ज्ञांच्या मते पुढील पूर्ण खग्रास सूर्यग्रहण भारतातून थेट काही दशकांनंतर दिसू शकेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement