Sunita Williams, Butch Wilmore अवकाशात अडकल्याने प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त होत असताना खात आहेत पिझ्झा; पहा ISS मध्ये त्यांच्या आहारात काय असतं?
याशिवाय प्रति अंतराळवीर प्रतिदिन सुमारे 3.8 पौंड अन्नाचा साठा आहे.
NASA चे अंतराळवीर Butch Wilmore आणि Sunita Williams सध्या अवकाशामध्ये International Space Station मध्ये अडकले आहेत. आता या घटनेला 5 महिने होत आले आहेत. अवकाशात अडकल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. सध्या अवकाशामध्ये ISS मध्ये एअर लीक होत असल्याच्या बातम्या येत असल्याने त्यांचा धोका वाढल्याचेही वृत्त आहे. अंतराळवीरांचे रोडावलेले फोटोज पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि ते नेमकं काय खाऊन दिवस ढकलत आहेत याचीही उत्सुकता वाढली आहे.
रिपोर्ट्सनुसार, सध्या सुनिता विल्यम्स आणि अन्य अंतराळवीर पिझ्झा, shrimp cocktails आणि roast chicken खाऊन गुजराण करत आहेत. The New York Post मधील वृत्तानुसार, सुनिता आणि अन्य अंतराळवीरांना फारच थोडा ताज्या पदार्थांचा पुरवठा होत आहे. आठ दिवसांसाठी गेलेल्या Butch Wilmore आणि Sunita Williams यांच्या Boeing Starliner मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला आणि आता ते 5 महिने तेथे अडकले आहेत.
नासा कडून या अंतराळवीरांचे फोटोज शेअर करण्यात आल्यानंतर सुनिता फारच कृश दिसत होत्या. मात्र नंतर त्यांनीच खुलासा करत आपल्या प्रकृतीमध्ये हा बदल "fluid shifts" मुळे झाल्याचं म्हटलं आहे. हे आरोग्याच्या समस्येमुळे नव्हे तर microgravity मुळे झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत. The American Space Agency च्या माहितीनुसार, सध्या ISS मध्ये अडकलेल्या अंतराळवीरांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे.
Butch Wilmore आणि Sunita Williams यांच्या आहारात काय?
रिपोर्ट्सनुसार, Butch Wilmore आणि Sunita Williams यांच्या आहारात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये नाश्तात cereal सोबत पावडर मिल्क, रोस्डेड चिकन, पिझ्झा, श्रिम्प कॉकटेल, टुना यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार ताजी फळं आणि भाज्यांचा अगदीच मर्यादित साठा आहे. Starliner mission च्या स्पेशलिस्टच्या माहितीनुसार, ISS दर तीन महिन्यांनी सामानाची सोय करत आहे. तज्ञांनी असेही सांगितले की फळे आणि भाज्या पॅक किंवा फ्रीझ-वाळलेल्या आहेत.
NASA च्या माहितीनुसार, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये मिशनच्या अशाच अनिश्चित वाढलेल्या प्रवासाठी अतिरिक्त अन्नाचा असतं. याशिवाय प्रति अंतराळवीर प्रतिदिन सुमारे 3.8 पौंड अन्नाचा साठा आहे.
प्रत्येक अंतराळवीराच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न केवळ वैयक्तिकृत केले जात नाही, तर ते गोठवून वाळवलेले किंवा पॅक केलेले देखील असते जेणेकरून ते खाण्यासाठी फूड वॉर्मर वापरून पुन्हा गरम केले जाऊ शकते.
सर्व मांस आणि अंडी पृथ्वीवर शिजवले जाते आणि त्यांना फक्त वापरण्यासाठी तेथे पुन्हा गरम करणे आवश्यक आहे. अंतराळ स्थानकावर 530-गॅलन ताज्या पाण्याची टाकी असली तरी अन्नाव्यतिरिक्त, ISS अंतराळवीरांचे मूत्र आणि घाम गोड्या पाण्यात रिसायकल करते.