Solar Eclipse, Lunar Eclipse of 2022: सूर्यग्रहण, चंद्रग्रहण भारतात दिसत नसले तरीही पाहू शकाता; कसे? घ्या जाणून

भारतात तर सूर्यग्रहणाबद्दल अधिकच उत्सुकता. येत्या 30 एप्रिल रोजीही सूर्यग्रहण आणि16 एप्रिल रोजी चंद्रग्रहण जगभरातील अनेक ठिकाणी दिसणार आहे.

Eclipse | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

सूर्यग्रहण (Solar Eclipse), चंद्रग्रहण (Lunar Eclips) म्हटलं की अनेकांना आकर्षण नेहमीच वाटते. भारतात तर सूर्यग्रहणाबद्दल अधिकच उत्सुकता. येत्या 30 एप्रिल रोजीही सूर्यग्रहण आणि16 एप्रिल रोजी चंद्रग्रहण जगभरातील अनेक ठिकाणी दिसणार आहे. भारतात मात्र हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नाही. मात्र हे सूर्यग्रहण आपण ऑनलाईन पाहू शकता. तारांगणचे माजी संजाचलक डॉ. एमपी बिर्ला म्हणाले की, येत्या 30 एप्रिल रोजी दिसणारे आंशिक सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण आणि नैऋत्य भागातून, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर आणि अंटार्टिकाच्या बहुतेक भूभागातून दिसणार आहे. भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही. इच्छुक लोक हे सूर्यग्रहण ऑनलाईन पाहू शकतात. (हेही वाचा, Surya Grahan 2022: 30 एप्रिल रोजी होत सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्याचा खास संयोग; गर्भवती महिलांनी करू नये 'हे' काम)

सूर्यग्रहण

अंशिक सूर्यग्रहण सकाळी 12:15 च्या सुमारास सुरू होईल. भारतासाठी कमाल सूर्यग्रहण पहाटे 2.11 च्या आसपास असेल आणि 1 मे रोजी पहाटे 4.07 वाजता समाप्त होईल. भारतात या काळात रात्र असल्याने सूर्यग्रहण दिसणार नाही.

चंद्रग्रहण

16 मे 2022 रोजी चंद्रग्रहण दिवसा होईल. हे चंद्रग्रहण सकाळी 7.02 वाजता सुरू होईल आणि संपूर्ण ग्रहण सकाळी 7.57 वाजता सुरू होईल.

जास्तीत जास्त ग्रहण सकाळी 9.41 च्या आसपास असेल जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात सखोल भागात असेल .ग्रहण सकाळी 10.23 वाजता संपेल. ग्रहणाचा आंशिक टप्पा सकाळी 11.25 पर्यंत संपेल.

चंद्रग्रहण कसे पाहाल?

ज्या ठिकाणी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पाहायला मिळणार नाही. त्या प्रदेशातील लोक ऑनलाई सूर्यग्रहण, चंद्रग्रहण पाहू शकतात. त्यासाठी आपण YouTube चा आधार घेऊ शकता.