Eclipse 2022: यंदाच्या वर्षी कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? तारखा घ्या जाणून

नव्या वर्षातील सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2022) आणि चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) कोणत्या तारखेला आहे. ते भारतात आपण राहात असलेल्या ठिकाणी पाहता येणार किंवा नाही. याबाबतही अनेक तर्क वितर्क असतात.

Eclipse | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

नवे वर्ष सुरु झाले की रुढी परंपारा आणि विज्ञान मानणाऱ्या अनेकांच्या नजरा लागलेल्या असतात सूर्य आणि चंद्र ग्रहणाकडे. नव्या वर्षातील सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2022) आणि चंद्र ग्रहण (Lunar Eclipse) कोणत्या तारखेला आहे. ते भारतात आपण राहात असलेल्या ठिकाणी पाहता येणार किंवा नाही. याबाबतही अनेक तर्क वितर्क असतात. सूर्य, चंद्र ग्रहणाबाबत समज गैरसमजही अनेक असतात. अर्थात इथे त्याबाबत चर्चा नाही. मात्र, यंदाच्या वर्षी कोणत्या तारखेला सूर्य आणि चंद्र ग्रहण आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, यंदा (2022) एकूण वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्र ग्रहण लागणार आहेत. यातील पहिले सूर्य ग्रहण (Surya Grahan 2022) हे 30 एप्रिलला अंशीक रुपात असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. अशाच पद्धतीने पहिले चंद्र ग्रहण (Chandra Grahan 2022) 16 मेला दिसेल.

पहिले चंद्र ग्रहण पाश्चिमात्य देशात दिसणार आहे. हे ग्रहण भारतात पाहायल मिळणार नाही. चंद्र ग्रहण (Lunar Eclipse 2022) आणि सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2022) ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. मात्र, असे असले तरी त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो असे मानले जाते. त्यामुळे अनेकांच्या मनात ग्रहणाविषयी संभ्रम, भीती आणि उत्सुकता पाहायला मिळते. (हेही वाचा, Chandra Grahan 2021 Sutak Dos and Don'ts: अन्न न शिजवणं ते चंद्र मंत्र पठण पहा आजच्या चंद्र ग्रहणामध्ये काय कराल काय टाळाल?)

पहिले सूर्य ग्रहण (Surya Grahan 2022) 30 एप्रील 2022 या दिवशी लागेल. हे ग्रहण दुपारी 12.15 ते दुपारी 04.07 या काळापर्यंत राहील. दरम्यान, हे ग्रहण अंशकालीन असेल. ज्याचा प्रभाव दक्षिण-पश्चिम अमेरिका, प्रशांत अटलांटिक आणि अंटार्कटिका देशांमध्ये पाहबायला मिळेल.

पहिले चंद्र ग्रहण (Chandra Grahan 2022 Date) 16 मे या दिवशी दिसेल. हे चंद्र ग्रहणही भारतात पाहायला मिळणार नाही. हे ग्रहण सकाळी 7.02 ते दुपारी 12.20 वाजेपर्यंत पाहायला मिळेल. या शिवाय हे ग्रहण दक्षिणी-पश्चिमी यूरोप, दक्षिणी-पश्चिमी एशिया, अफ्रीका, उत्तरी अमेरिका, दक्षिणी अमेरिका, पैसिफिक, अटलांटिक, अंटार्कटिका, हिंद महासागर आदी ठिकाणी पाहायला मिळेल.

सन 2022 दुसरे सूर्य ग्रहण 25 ऑक्टोबरला लागेल. हे सुद्धा अंशकालीन ग्रहण मानले जात आहे. हे ग्रहण सायंकाळी 04:29:10 वाजता सुरु होईल आणि 05:42:01 पर्यंत राहील. हे ग्रहण यूरोप, दक्षिण-पश्चिम एशिया, अफ्रीका आणि अटलांटिका आदी ठिकाणी पाहायला मिळेल. परंतू, भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

या वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण आठ नोव्हेंबरला लागेल. हे पूर्ण चंद्र ग्रहण असेल. चंद्र ग्रहणाची सुरुवात दुपारी 1.32 वाजता होईल. सायंकळी 7.27 वाजता हे ग्रहण समाप्त होईल. हे ग्रहण भारतासह दक्षिणी-पूर्वी यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तरी अमेरिका, दक्षिणी अमेरिका, पेसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागर भागात पाहायला मिळेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif