Sex-related Y Chromosome: शास्त्रज्ञांनी सोडवला लिंगाशी संबंधीत 'Y क्रोमोसोम' चा गुंता

संशोधकांना आढळून आले आहे की, मानवाच्या लैंगिक विषयात प्रमुख भूमिका निभावण्यासोबतच वाय क्रोमोसोम इतर बाबींमध्येही महत्त्वाची भूमिका निभावरतो.

Chromosome | Representational image (Photo Credits: pxhere)

पाठीमागील अनेक वर्षांपासून संशोधकांना चकवा देणाऱ्या मानवातील जणूकीय गुंतागुंतीचा गुंता सोडविण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. पुरुषांमध्ये असलेल्या वाय क्रोमोसोम संदर्भात मानवी जीनोम (Human Genome) संदर्भात वैज्ञानिक अनेक दशकांपासून संशोधन करत होते. ज्यावर अपेक्षीत परिणाम प्रथमच मिळाला आहे. ज्याबाबत सविस्तर माहिती नेचर जर्नल (Nature journal) मध्ये देण्यात आली आहे. संशोधकांना आढळून आले आहे की, मानवाच्या लैंगिक विषयात प्रमुख भूमिका निभावण्यासोबतच वाय क्रोमोसोम इतर बाबींमध्येही महत्त्वाची भूमिका निभावरतो.

सस्तन प्राण्यांमध्ये खास करुन मानव, शुक्राणूंच्या संयोगातूनच जन्माला येणारा जीव नर असेल की मादी हे ठरत असते. हे ठरविण्याचे, निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण काम क्रोमोसोम्स करत असतात. आपले शरीर विविध पेशींपासून बनलेले असते. प्रत्येक पेशीच्ये केंद्रामध्ये न्यूक्लियस नावाचा एक भाग असतो. यामध्ये एक श्रृंखला असते. ज्याला क्रोमोसोम्स म्हणतात. हे क्रोमोसोम्स म्हणजे एक अशी उतरंड आहे. जी मानवी जीन्सबद्दल माहिती ठेवते. त्याचे व्यवस्थापन करते.

आपल्या शरीरात प्रत्येक पेशीमध्ये 23 जोड्या म्हणजेच जवळपास 46 क्रोमोसोम्स असतात. 23 जोड्यांचे हे गणीतही तितकेच रंजक आहे. कारण या क्रोमोसोम्सपैकी आर्धे आई आणि आर्धे वडीलांकडून मिळतात. 1 ते 22 जोड्यांचे क्रोमोसोम्स म्हणजे सुरुवातीचे 22 जोड्यांचे ऑटोसोम्स म्हणून ओळखले जातात. 23 व्या जोडीला सेक्स क्रोमोसोम्स म्हटले जाते. ही जी 23 वी जोडी आहे तीच ठरवते जन्माला येणारा जीव नर असेल की मादी. मुलींमध्ये दोन एक्स (XX) क्रोमोसोम्स असतात. तर मुलांमध्ये एक एक्स आणि एक वाय असे (XY) दोन क्रोमोसोम्स असतात. कधी कधी यात काही अपवादही असतात. वैज्ञानिकांनी लावलेला शोध भविष्यात अनेक गोष्टींचा उलघडा करणार आहे.



संबंधित बातम्या

Plane Crash in Brazil: ब्राझीलमध्ये विमान कोसळले, 14 ठार; Amazon राज्यातील घटना

Sex-related Y Chromosome: शास्त्रज्ञांनी सोडवला लिंगाशी संबंधीत 'Y क्रोमोसोम' चा गुंता

NASA-ISRO's NISAR Satellite: नासा आणि इस्त्रो यांचा संयुक्त उपग्रह 2025 मध्ये होणार प्रक्षेपित; पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे उद्दिष्ट

Fraud Calls: दररोज 1.35 कोटी फसवणूक कॉल थांबवत आहे मोदी सरकार; आतापर्यंत लोकांचे 2500 कोटी रुपये लुटण्यापासून वाचले

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर विकले जात होते Lawrence Bishnoi, Dawood Ibrahim यांचा गौरव करणारे टी-शर्टस; महाराष्ट्र सायबर सेलकडून Flipkartसह अनेक कंपन्यांवर गुन्हा दाखल

iPhone Blast in China: आयफोन 14 प्रो मॅक्सचा चार्ज करताना स्फोट; युजर जखमी, Apple ने जारी केले निवेदन