Shashikumar Chitre Passes Away: जेष्ठ गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ, पद्मभूषण शशिकुमार चित्रे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

नंतर त्यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेमध्ये काम करण्यासाठी विशेष अभ्यासवृत्ती मिळाली. ते 1967 मध्ये भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले

Shashikumar Chitre (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, प्राध्यापक शशिकुमार मधुसूदन चित्रे (Shashikumar Madhusudan Chitre) यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त असे चित्रे हे भारतीय खगोलशास्त्र, खासकरुन सौर भौतिकीचे अभ्यासक होते. 2001 मध्ये ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथून ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. कलिना कॅम्पस येथील मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमागील ते एक प्रेरक शक्ती होते. Atomic Energy Centre for Excellence in Basic Sciences (UM-DAE CEBS) विभागासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती.

प्रा. चित्रे यांनी नेहरू सेंटर ट्रस्ट आणि जेएन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर अनेक वर्षे काम केले. विज्ञान शिक्षण आणि पोहोच याबद्दल अतिशय उत्साही असल्याने, त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याख्याने दिली. संस्थानचे संचालक अरविंद परांजपे यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या नेहरू प्लॅनेटेरियममध्ये पहिल्यांदा होणाऱ्या शोमागील ते एक बुलंद आवाज होते. प्रा. चित्रे हे भारतीय खगोलशास्त्र संस्थेचे माजी अध्यक्ष आणि इतरही काही समित्यांचे सदस्य होते, ज्यांनी भारताच्या विज्ञान धोरणांना आकार देण्यास मदत केली. (हेही वाचा: रस्ता अपघातात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू)

दरम्यान, चित्रे यांच्या कारकीर्दीची सुरुवात लीड्स विद्यापीठात व्याख्याते म्हणून झाली, तेथे ते 3 वर्षे होते. नंतर त्यांना कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेमध्ये काम करण्यासाठी विशेष अभ्यासवृत्ती मिळाली. ते 1967 मध्ये भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. चित्रे यांनी केंब्रिज, प्रिन्स्टन, ससेक्स, कोलंबिया, व्हर्जिनिया अशा अनेक विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. चित्रे यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.