Ozone Layer Hole: उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातील मोठं छिद्र मिटल्याचा संशोधकांचा दावा
दरम्यान मार्च 2020 मध्ये संधोधकांना पहिल्यांदा हे छिद्र दिसलं होतं मात्र आता The Copernicus Climate Change Service (C3S) आणि Copernicus Atmosphere Monitoring Service (CAMS) या युरोपियन हवामान खात्याची माहिती देणार्या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
जगभरात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे लोकं घरात असली आहे. सामान्य नागरिकांना हा लॉकडाऊन नकोसा वाटत असला तरीही या लॉकडाऊनची सकारत्मक बाजू म्हणजे निसर्गाचं झालेलं नुकसान आता मोठ्या प्रमाणात भरून निघालं आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार, उत्तर धुव्रावरील ओझोन लेअरवरील छिद्र आता भरून निघालं आहे. दरम्यान मार्च 2020 मध्ये संधोधकांना पहिल्यांदा हे छिद्र दिसलं होतं मात्र आता The Copernicus Climate Change Service (C3S) आणि Copernicus Atmosphere Monitoring Service (CAMS) या युरोपियन हवामान खात्याची माहिती देणार्या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर धुव्रीय भागात म्हणजेच आर्कटिकवरील सुमारे 1 मिलियन वर्ग किलोमीटरचं ओझोनवरील छिद्र आता ठीक झालं आहे. दरम्यान यामागे लॉकडाऊननमधील कमी झालेली प्रदुषणाची पातळी नसून ध्रुवीय भागातील थंड हवा आणि इतर कारणं आहेत. Lockdown: गंगा नदी प्रदूषणाच्या पातळी घट; ऋषिकेश ते लक्ष्मण झुलापर्यंत वाहणार्या नदीच्या शुद्ध पाण्याचा व्हिडिओ व्हायरल.
Copernicus ECMWF Tweet
ओझोनच्या लेअरमुळे सूर्याची अतिनील किरणं थेट पृथ्वीवर पडण्यापासून रोखलं जातं. ही किरणं मानवी आयुष्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे त्वचेच्या कर्करोगापासून अनेक त्वचाविकार होऊ शकतात.