Moon Mission For Woman: जेफ बेझोस यांची कंपनी Blue Origin चंद्रावर पाठवणार पहिली महिला (Watch Video)
याआधी अनेक महिला अंतराळात गेल्या आहेत मात्र अजूनतरी कोणत्या महिलेले चंद्रावर पाऊल ठेवले नाही.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोसची (Jeff Bezos) यांची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin), पहिल्यांदाच एका महिलेला चंद्रावर (Moon) घेऊन जाणार आहे. याआधी अनेक महिला अंतराळात गेल्या आहेत मात्र अजूनतरी कोणत्या महिलेले चंद्रावर पाऊल ठेवले नाही. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. जेफने ही माहिती अशावेळी दिली आहे, जेव्हा नासाने 2024 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठविण्यास सक्षम खासगी अंगभूत लुनार लँडर्स (Privately Built Lunar Landers) निवडण्याचे ठरविले.
जेफ यांनी, अलाबामा येथील हंट्सविलेमध्ये नासा मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर येथे या आठवड्यात पार पडलेल्या लँडर इंजिन चाचणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणतात, 'हे (बीई -7) इंजिन पहिल्या महिलेला चंद्राच्या पृष्ठभागावर नेईल. बीई-7 इंजिनचा विकास करण्यासाठी ब्लू ओरिजिनने अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत.' (हेही वाचा: NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश; पहिल्यांदाच International Space Station मध्ये उगवण्यात आला 'मुळा' (Watch Video)
ब्लू ओरिजिन मुख्य कंत्राटदार म्हणून 'राष्ट्रीय संघा'चे नेतृत्व करत आहे. 2019 मध्ये अनेक कंपन्यांनी आपला ब्ल्यू मून लँडर बनविण्यासाठी या कंपनीशी हातमिळवणी केली होती. या राष्ट्रीय संघात लॉकहीड मार्टिन कॉर्प, नॉर्थ्रॉप ग्रुमन कॉर्प आणि ड्रॅपर यांचा समावेश आहे. अलीकडील काही वर्षांत ब्लू ओरिजिनची अनेक सरकारी करारावर नजर आहे. पुढच्या दशकात मनुष्याला चंद्रावर पोहोचवण्यासाठी नासाची पुढील मानवी चंद्र लँडिंग सिस्टम कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी, ही कंपनी त्याचे प्रतिस्पर्धी अब्जाधीश एलोन मस्कच्या स्पेसएक्स आणि लीडोस होल्डिंग्ज कॉर्पोरेशनची कंपनी डायनामिक्सशी स्पर्धा करीत आहे.
एप्रिलमध्ये नासाने ब्लू ओरिजिन टीमला $ 579 दशलक्ष डॉलर्सचे, लुनार लँडर विकसित करण्यासाठी कंत्राट दिले, तर अन्य दोन कंपन्या स्पेसएक्सला त्यांची स्टारशिप प्रणाली विकसित करण्यासाठी 135 दशलक्ष डॉलर आणि लीडोस होल्डिंग्ज कॉर्पोरेशनची कंपनी डायनेटिक्सला 253 दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले होते.