Lunar Eclipse 2020: आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा 'हे' काम करु नका

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Youtube Screenshot)

Lunar Eclipse 2020: यंदाचे वर्ष 2020 मधील अखेरचे चंद्रग्रण आज दिसणार आहे. तर चंद्रग्रहणावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्रादरम्यान येतात. या स्थितीमध्ये पृथ्वीच्या छायेमुळे चंद्र झाकला जातो. चंद्रग्रहण खुल्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. चंद्रग्रहणानंतर पुढील महिन्यात म्हणजेच 14 डिसेंबरला सूर्य ग्रहण (Solar Eclipse) लागणार आहे. या दोन्ही खगोलीय घटना भारता व्यकिरिक्त जगातील अन्य देशात ही पाहता येणार आहे. यासाठी भारतात सूतक काळ मान्य असणार नाही आहे.

जगभरातील अन्य ठिकाणी सुद्धा जेव्हा चंद्र ग्रहण आणि सूर्यग्रहण लागते तेव्हा कोणते ही शुभ काम करु नये असे मानतात. ज्योतिष विज्ञानात असे ही मानले जाते की, चंद्र ग्रहणावेळी काही कामे टाळली पाहिजेत. तसेच काही कामे केल्यास उत्तम फळ ही मिळते. तर जाणून घ्या चंद्रग्रहणात कोणती कामे करु नयेत.(Last Chandra Grahan 2020: 30 नोव्हेंबरला वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; जाणून घ्या या छायाकल्प चंद्रग्रहणाच्या वेळा!)

-चंद्रग्रहणावेळी केसांना तेल लावणे, जेवण करणे, पाणी पिणे, झोपणे, केस विंचरणे, पार्टनरसोबत जवळीक साधणे, दात घासणे, कपडे धुणे अशा गोष्टी करणे टाळाव्यात.

-चंद्रग्रहणात अन्नाचे सेवन करु नये. असे मानले जाते की, त्यावेळी जेवढे अन्न तुम्ही खाता तेवढाच त्रास तुम्हाला नरकामध्ये भोगावा लागतो.

-झोपणे ही टाळावे. त्याचसोबत चंद्रग्रहणात तीन प्रहार म्हणजेच 3 तास काहीच खाऊ नये. हा नियम मात्र रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांसाठी लागू होत नाही.

-स्कंद पुराणाच्या मते दुसऱ्यांचे अन्न किंवा एखाद्याने दिलेले खाल्ल्याने पुण्य कमी होते.

-चंद्रग्रहणावेळी कोणतेही शुभ काम करु नये. तर मनातच देवाचे नामस्मरण करावे.

दरम्यान, चंद्रग्रहण दुपारी 1.04 मिनिटांनी सुरु होणार आहे. चार तास असणारे हे चंद्रग्रहण दुपारी 3.13 मिनिटांनी आपल्या शेवटच्या टप्प्यात असणार असून 5.22 मिनिटांनी संपणार आहे. हे चंद्रग्रहण अत्यंत महत्वाचे असून ते रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीवर पडणार आहे.