अंतराळात भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्यासाठी योजना सुरू: इस्त्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांची माहिती
जर भारत वेळेत हे उद्दिष्ट आपण गाठू शकले तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी घोषित केलेल्या 'गगनयान' या मिशनला आता अधिक मोठ्या टप्प्यावर नेण्यासाठी इस्त्रो सज्ज झाली आहे. आज इस्त्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन (K. Sivan) यांनी लवकरच अंतराळात भारताचं स्पेस स्टेशन निर्माण करण्याचा मानस व्यकत केला आहे. त्यासाठी इस्त्रोमध्ये (ISRO) योजना सुरू आहे. Chandrayaan 2: 'इस्रो' ने दाखवली चंद्रयान-2 ची पहिली झलक, जुलै महिन्यात होणार लॉन्च
ANI Tweet
'अवकाशात माणूस पाठवण्याच्या मोहीमेनंतर गगनयान हे मिशन सुरू राहील. भारत स्वत:चे अवकाश स्थानक असावे या दृष्टीने प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी आज दिली आहे. डिसेंबर 2021 पर्यंत अवकाशात माणूस पाठवण्याचं भारतासमोर उद्दिष्ट आहे. गगनयान मोहिमेद्वारे भारताचं हे स्वप्न साकार होईल. जर भारत वेळेत हे उद्दिष्ट आपण गाठू शकले तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागणार आहे.
इस्त्रो 15 जुलै 2019 दिवशी चंद्रयान 2 अवकशामध्ये सोडणार आहे. हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाकंक्षी प्रकल्प आहे. श्रीहरिकोटा येथून हे उड्डाण होणार आहे.