Sunita Williams यांची प्रकृती खालावतेय? NASA ने अंतराळवीरांच्या आरोग्याबद्दल अपडेट

Elon Musk च्या Dragon capsule द्वारा त्यांना आणलं जाणार आहे.

Sunita Williams and Butch Wilmore (Photo Credit: NASA)

NASA च्या अंतराळवीर Sunita Williams,या सध्या अवकाशामध्ये International Space Station मध्ये अडकल्या आहे. अचानक Starliner spacecraft मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा मुक्काम 6 महिने वाढला आहे. आता याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर दिसायला लागला आहे. 8 दिवसांसाठी अवकाशामध्ये गेलेल्या सुनीता विल्यम्स सोबत Barry Wilmore आहेत.

नुकत्याच जारी फोटोंमध्ये विल्यम्स आता कृश दिसत आहेत. त्याचं वजन कमी झाल्याने आता वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. Seattle येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विनय गुप्ता यांनी टिप्पणी केली की विल्यम्सची स्थिती पाहता तिलाcalorie deficit सह दीर्घकाळ अंतराळात राहण्याचा शारीरिक ताण येत असावा.

विल्यम्स पिझ्झा आणि स्नॅक्सचा आस्वाद घेताना दिसत असल्या तरी डॉ. गुप्ता यांनी नमूद केले की तिचे शरीर ती खात असलेल्या पेक्षा जास्त कॅलरी बर्न होत आहेत. जे अवकाशातील calorie-demanding environment मध्ये सामान्य आहे. ही समस्या स्नायू आणि हाडांच्या झीजशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर शारीरिक दिनचर्यामुळे वाढली आहे, कारण अंतराळवीरांनी दररोज सुमारे 2.5 तास व्यायाम करणे अपेक्षित आहे. या चिंता असूनही डॉ. गुप्ता तिची स्थिती तात्काळ जीवघेणी नसल्याचं म्हणत आहेत. पण सध्या तिचं वजन तिच्या आरोग्याला आवश्यक आहे तितकं आहे की नाही याचा प्रश्न कायम आहे.

SpaceX च्या क्रू-8 अंतराळवीर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात ISS वरून परत आल्यानंतर, त्यांना ताबडतोब वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, एक अतिरिक्त उपचारांसाठी रात्रभर थांबला. यामुळे अंतराळवीरांवरील अंतराळ प्रवासाचे आरोग्य धोके आणि दीर्घकालीन परिणामांबद्दल आणखी चिंता निर्माण झाली.

सुनिता विल्यम्स यांच्या आरोग्याबद्दल NASA काय म्हणतय?

सुनिता विल्यम्स यांच्या आरोग्यावर NASA ने माहिती देताना ISS वरील अंतराळवीरांवर फ्लाइट सर्जनद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि नियमित तपासणी होत आहे. Jimi Russell, spokesperson for NASA’s Space Operations Mission Directorate च्या माहितीनुसार, अंतराळवीरांचं आरोग्यं स्थिर आहे.

अंतराळवीरांच्या आरोग्याकडे सध्या बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या आरोग्याच्या धोक्याची काळजी घेतली जात आहे. आता सुनीता विल्यम्स फेब्रुवारी 2025 मध्ये पुन्हा पृथ्वीवर येण्याची अपेक्षा आहे. Elon Musk च्या Dragon capsule द्वारा त्यांना आणलं जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif