Chandrayaan-3: 'चंद्रावर सल्फर', ISRO ने दिली 'गुड न्यूज'; दुसऱ्या पेलोडनेही केली पुष्टी (Watch Video)

इस्त्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) ने सल्फर सोबतच चंद्रावरील इतरही काही छोट्या घटकांचा शोध लावला आहे.

Photo Credit - Twitter,ISRO )

चंद्रयान-3 (Chandrayaan-3) रोवर प्रज्ञानच्या (Pragyan) पेलोड द्वारा चंद्रावर मोठ्या प्रमाणावर सल्फर असल्याची पुष्टी झाल्यानंतर आता पुढच्या काहीच दिवसात रोवरवर असलेल्या इतर उपकरणांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून द्रुव प्रदेशावरही सल्फर असल्याची पुष्टी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्त्रो द्वारा झालेल्या ट्विटमध्ये ही माहिती गुरुवारी (31 ऑगस्ट) देण्यात आली आहे. इस्त्रोने ट्विटमध्ये म्हटले आहे की, अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) ने सल्फर सोबतच चंद्रावरील इतरही काही छोट्या घटकांचा शोध लावला आहे. सीएच-3 च्या या विशेष शोधकामात या प्रदेशात सल्फर (S) स्त्रोतांवर विशेष संशोध करण्यास भाग पाडते की, हे चंद्रावरील अंतर्गत रुपातच आहे की काही ज्वालामुखीय अथवा उल्कावर्षामुळे उपलब्ध आहे.

इस्त्रोने चंद्रावर अगधी सुरक्षीतपणे फिरत असलेल्या रोव्हरचा व्हिडिओ जारी केला आहे. जे दृश्य रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले आहे. या व्हिडिओला इस्त्रोने दिलेले कॅप्शनही अत्यंत बोलके आहे. इस्त्रोने म्हटले आहे की, 'चंदामामाच्या अंगणात लहान मूल खेळत आहे, तर आई प्रेमाने पाहते आहे. नाही का?' सोशल मीडियावर अनेकांना ही कॅप्शन प्रचंड आवडली आहे. नेटीझन्सनी त्याचे जोरदार कौतुक केले आहे. स्पेस एजन्सीने 18 सेमी उंच APXS फिरवणारी स्वयंचलित बिजागर यंत्रणा दर्शविणारा हा व्हिडिओ जारी केला आहे. डिटेक्टर हेड चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळपास पाच सेंटीमीटर आहे.

व्हिडिओ

साधारण, 26 किलो वजनाचा, सहा चाकांचा, सौरऊर्जेवर चालणारा प्रज्ञान रोव्हर चांद्रयान-3 उतरलेल्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात चंद्राची माती आणि खडक कशापासून बनले आहेत. याची नोंद करण्यासाठी त्याच्या वैज्ञानिक उपकरणांचा वापर करण्यासाठी सुसज्ज आहेय तो ते रीडिंग कसे होते हे देखील दर्शवेल. APXS हे साधन चंद्रासारख्या कमी वातावरण असलेल्या ग्रहांच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या मूलभूत रचनेच्या इन-सीटू विश्लेषणासाठी सर्वात योग्य आहे, असे इस्रोच्या निवेदनात म्हटले आहे. चंद्रयान मोहिमेुळे भारताची प्रतिमा जगभरात आणखी उठावदार झाली आहे. चंद्रावर यान सोडणाऱ्या काही मोजक्याच देशांच्या यादीत भारताचे नाव पोहोचले आहे.