IPL Auction 2025 Live

'चांद्रयान-2' च्या विक्रम लँडरला शोधले, नासाकडून छायाचित्र जारी

परंतु, चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडींग होण्याआधी वैज्ञानिकांचा लॅंडरशी असलेला संपर्क तुटला.

भारताने दुसरी चंद्रमोहीम चांद्रयान-2 (Chandrayaan-2) मोहीम अंतर्गत विक्रम लॅंडर चंद्रावर पोहचवून विक्रम रचला होता. परंतु, चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडींग होण्याआधी वैज्ञानिकांचा लॅंडरशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर विक्रम लॅंडर दुर्घटनाग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यातच चंद्राच्या पृष्ठभागावर दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान-2 च्या विक्रम लॅंडरचे अवशेष अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) शोधून काढले आहे. नासाने आज मंगळवारी सकाळी लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरकडून (Lunar Reconnaissance Orbiter) काढण्यात आलेले एक छायाचित्र जारी केले आहे. छायाचित्रात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या ठिपक्यांच्या दिसत आहेत. या ठिपक्यांना माध्यमातून विक्रम लॅंडरचे अवशेष दाखवण्यात आले आहे.

विक्रम लॅंडरच्या संबंधित नासाने आपल्या निवदेनात म्हटले आहे की, त्यांनी 26 सप्टेंबरला कोसळलेल्या जागेचे एक छायाचित्र जारी केले होते आणि लोकांनी विक्रम लँडरच्या संकेतांचा शोध करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर षण्मुग सुब्रमण्यम नावाच्या एका व्यक्तीने अवशेषाच्या एका सकारात्मक मान्यतेसह एलआरओ परियोजनेशी संपर्क केला. षण्मुगने कोसळलेल्या मुख्य ठिकाणापासून उत्तर-पश्चिममध्ये सुमारे ७५० मीटर अंतरावर अवशेषाची ओळख पटवण्यात आली. अवशेषाचे तीन सर्वांत मोठे तुकडे 2x2 पिक्सलचे आहेत. हे देखील वाचा- Chandrayaan-2 Updates: चांद्रयान 2 चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वी प्रवेश; ISRO ने दिली माहिती

नासाचे ट्वीट-

भारताची दुसरी चांद्रमोहिम 'चांद्रयान- 2' 22 जुलै 2019 रोजी अवकाशामध्ये झेपावले होते. चैन्नई नजिक असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या प्रक्षेपण तळावरून चांद्रयान-२ चे उड्डाण करण्यात आले होते.