Chandra Grahan 2026: 28 ऑगस्ट, श्रावण पौर्णिमा दिवशीचं आंशिक चंद्रग्रहण कधी, कुठे, कसं दिसणार ?

27-28 ऑगस्ट रोजी होणारे 96 टक्के आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका तसेच युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांतील सुमारे 330 कोटी लोकांना दिसणार आहे. मात्र भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानमधील नागरिकांना हे ग्रहण पाहता येणार नाही.

Chandra Grahan 2026 | Pexels

येत्या 27-28  ऑगस्ट रोजी 2026 वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) दिसणार आहे. ग्रहण ही एक अद्भूत खगोलीय घटना आहे. पण भारतामध्ये ग्रहणाविषयी समज गैर समज अधिक असल्याने लोकांच्या मनात त्याबद्दल कुतुहल देखील आहे. 28 ऑगस्ट दिवशी रात्री होणारे आंशिक चंद्रग्रहण  (Partial Lunar Eclipse) चंद्राच्या पृष्ठभागाचा तब्बल 96 टक्के भाग पृथ्वीच्या सावलीत झाकून टाकणार आहे. या वेळी चंद्र लालसर रंगात चमकताना दिसण्याची शक्यता आहे, कारण पृथ्वीच्या वातावरणातून गाळला जाणारा आणि वक्रीभूत झालेला सूर्यप्रकाश चंद्रावर पडतो. मात्र भारतात हे ग्रहण दिसणार नसल्याने त्यांना थेट हा अनुभव घेता येणार नाही.

27-28  ऑगस्टचे चंद्र ग्रहण कधी आणि कसे घडणार

महिन्याच्या पौर्णिमेच्या टप्प्यात पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा हे आंशिक चंद्रग्रहण घडते. श्रावणी पौर्णीमेचं चंद्रग्रहण हे आंशिक चंद्रग्रहण आहे.  या दरम्यान पृथ्वीची वक्राकार अंतर्गत सावली चंद्राच्या पृष्ठभागावरून सरकताना दिसेल, तर कमाल ग्रहणाच्या क्षणी चंद्राचा एक पातळ चंद्रकोर थेट सूर्यप्रकाशात उघडा राहील. नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का? 

27-28  ऑगस्टचे चंद्र ग्रहण कुठे दिसणार

27-28 ऑगस्टचे हे आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका तसेच युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांतील सुमारे ३३० कोटी लोकांना दिसणार आहे. ग्रहणाचा प्रत्येक टप्पा जगभरातील सर्व निरीक्षकांसाठी एकाच वेळी घडेल, मात्र स्थानिक वेळेनुसार तो पाहण्याची वेळ वेगवेगळी असेल.

अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील लॉस एंजेलिस आणि पोर्टलंडसारख्या शहरांमध्ये सूर्यास्तानंतर काही तासांतच कमाल ग्रहणाचा क्षण येईल, तर न्यूयॉर्क आणि जॅक्सनव्हिलसारख्या पूर्व किनारपट्टीवरील शहरांमध्ये हे ग्रहण स्थानिक वेळेनुसार साधारण मध्यरात्री शिखरावर पोहोचेल. ब्रिटन, युरोप आणि आफ्रिकेत मात्र हे ग्रहण पहाटेच्या सुमारास, सूर्योदयापूर्वी चंद्र पश्चिम क्षितिजाकडे झुकत असताना दिसेल.

भारतासह अनेक देशांना ग्रहण दिसणार नाही

ग्रहण घडत असताना जे लोक पृथ्वीच्या रात्रीच्या बाजूला असतील त्यांनाच हे आंशिक चंद्रग्रहण पूर्णपणे अनुभवता येईल. मात्र त्या वेळी दिवसाच्या बाजूला असलेल्या भारत, ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानसह अनेक देशांतील नागरिकांना चंद्र क्षितिजाखाली असल्याने हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही.

चंद्रग्रहण  पाहण्यासाठी विशेष उपकरणांची गरज नाही

चंद्रग्रहण पाहण्यासाठी सुरक्षा चष्मा किंवा विशेष उपकरणांची आवश्यकता नसते. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनीही आकर्षक दिसते, मात्र दुर्बीण किंवा टेलिस्कोपच्या साहाय्याने पृथ्वीची सावली चंद्राच्या पृष्ठभागावरून सरकताना अधिक स्पष्टपणे पाहता येईल. २०२८-२९ च्या नववर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंतचे हे सर्वात सखोल चंद्रग्रहण असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement