आकाशात विमानांशी संपर्क कसा तुटतो? NASA करणार अभ्यास

या शोधासाठी नासा (NASA) छोट्याशा उपग्रहाची एक जाडी आंदराळात पाठवणार आहे. हा उपग्रह विमानाचा अवकाशातील संचार, रेडियो, जीपीएस सिग्नल यांचा पृथ्वीशी संपर्क नेमका कसा तुटतो. त्या वेळी नेमके काय होते? याचा शोध घेणार आहे.

National Aeronautics and Space Administration logo | (Photo Credits-.nasa.gov)

आकाशात विमान गायब होणं, त्याच्याशी संपर्क तुटणं हे काही आता नवं राहिलं नाही. या घटना तशा कमी अथवा अपवादाने घडत असल्या तरी त्या घडतात. हरवलेल्या विमानांचा शोधही घेतला जातो. काहींचा लागतो. काहींचा लागतच नाही. या सर्वच गोष्टी खऱ्या असल्या तरी, आकाशात विमानांचा संपर्क नेमका कसा तुटतो? याचा नासा ( National Aeronautics and Space Administration) शोध घेणार आहे. या शोधासाठी नासा (NASA) छोट्याशा उपग्रहाची एक जाडी आंदराळात पाठवणार आहे. हा उपग्रह विमानाचा अवकाशातील संचार, रेडियो, जीपीएस सिग्नल यांचा पृथ्वीशी संपर्क नेमका कसा तुटतो. त्या वेळी नेमके काय होते? याचा शोध घेणार आहे.

अमेरिकेच्या संरक्षण वाभागाच्या आंतरिक्ष परिक्षण कार्यक्रमांतर्गत येत्या 24 जून रोजी 24 उपग्रहांसोबत जुळी ई-टीबीईएक्स (Enhanced Tandem Beacon Experience) क्यूबेसॅटही लॉन्च केले जाईल.

ई-टीबीईएक्स (Enhanced Tandem Beacon Experience) अवकाशात हा अभ्यास करेन की, Ionosphere(रेडिओलहरी परावर्तित करणारा वातावरणातील थर, जो पृथ्वीपासून सुमारे ६० ते १००० किमी इतक्या उंचीपर्यत आढळतो) मध्ये वायूप्रमाणए रेडिओ सिग्नल कसे गायब होतात. सिग्नल गायब होण्याची सर्वाधिक समस्या ही भूमध्य रेषेच्या वर निर्माण होते. संशोधकांनी म्हटले आहे की, सर्वात आधी हे समजून घेतले पाहिजे की, विमानाचा संपर्क तुटण्यासाठीचे वातावरण नेमके कसे निर्माण होते. कारण या वातावरणनिर्मितीबाबत माहिती प्राप्त झाल्यास समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. (हेही वाचा, खुशखबर! आता उबरची हवाई कार; ट्रॅफिकच्या त्रासापासून नागरिकांची लवकरच सुटका)

ई-टीबीईएक्स मिशन पेलोड प्रोग्राम मॅनेजर रिक डो यांनी सांगितले की, Ionosphere मध्ये विमान सिग्नल गायब होण्याची प्रक्रिया शोधून काढणे तसे बरेच कठीण काम आहे. मात्र, तरीही हा शोध घेतला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif