Aliens and ‘Galactic Federation’ Exist: एलियन्स आणि अमेरिका यांच्यात गुप्त करार, Israeli general Haim Eshed यांचा दावा
हाईम यांनी पुढे म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या गुप्त कराराबाबत माहिती आहे. पृथ्वीतलावावरील एलियन्सची उपस्थिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे कारण एलियन्समध्ये अद्याप मानवता तयार झाली नाही
इस्त्राईल अंतराळ सुरक्षा उपक्रमाचे प्रमुख हाइम इशेद (General Haim Eshed) यांनी एक खळबळजनक दावा करत अमेरिकेवर आरोप केला आहे. हाइम इशेद (Haim Eshed) यांनी म्हटले आहे की, आंतराळात एलियन्स अस्तत्वात (Aliens Exist in Space) आहेत. इतकेच नव्हे तर ते पृथ्वीवरही लपून बसले आहेत. तसेच अमेरिका आणि एलियन्स यांच्यात एक गुप्त करार (Aliens- US Secret Deal) झाला आहे. एलियन्स इस्त्राईलच्याही संपक्रात असल्याचा दावा हाइम इशेद यांनी केला आहे. हाइम यांच्या आरोप आणि दाव्यानंतर जगभरातील आंतराळ संधकांच्या भूवया उचावल्य आणि खळबळ उडाली नाही तरच नवल.
हाईम यांनी पुढे म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या गुप्त कराराबाबत माहिती आहे. पृथ्वीतलावावरील एलियन्सची उपस्थिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे कारण एलियन्समध्ये अद्याप मानवता तयार झाली नाही. गेली 30 वर्षे इस्त्राईलचा स्पेस सिक्यॉरिटी प्रोग्राम (Israel's space security program) सांभाळलेल्या हाइम इशेद यांनी हा दावा केल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. हाईम यांनी म्हटले आहे की, 'गैलेक्टिक फेडरेशन' तयार करण्यात आले असून अमेरिकेसोबत झालेल्या गुप्त करारानुसार हे एलियन्स मंगळ ग्रहावर जमीनीखाली एक गुप्त अड्डा करुन राहात आहेत. (हेही वाचा, World UFO Day 2020: भारतासह जगभरात अनेक वेळा दिसली उडती तबकडी; वर्ल्ड यूएफओ डे निमित्त घ्या जाणून)
हाईम इशेद यांनी इस्त्राईलचा स्पेस सिक्यॉरिटी प्रोग्राम 30 वर्षे सांभाळला आहे. आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गेलेक्टिक फेडरेशन (Galactic Federation) नावाची एक संघटान आहे. यात वॉशिंक्टनसोबत एक गुप्त करार करण्यात आला आहे. त्यानुसार मंगळ ग्रहावर एक अंडरग्राउंड स्पेस बेस निर्माण करण्यात आला आहे. यातून आंतराळवीर आणि एलियन्स एकमेकांसोबत सहकार्याने काम करत आहेत. (हेही वाचा, Alien-Human Hybrids साठी एलियन्स सोबत सेक्स? जगभरातील व्यक्तींचा खळबळजनक दावा)
ग्लोबल न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यात प्रदीर्घ काळापासून एलियन्सवर काम सुरु आहे. परंतू त्यांचे अस्तित्व एक रहस्य बनून राहिले आहे. कारण मानवता अद्याप तयार झाली नाही. या वृत्तात हाईम यांचा हवाला देत म्हटले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एलियन्सच्या उपस्थितीबाबत खुलासा करणार होते. परंतू, गेलेक्टिक फेडरेशनमध्ये असलेल्या एलियन्सनी त्यांना असे करण्यास मनाई केले. एलियन्सनी रोखळ्यामुळेच ट्रम्प यांनी एलियन्सबाबत माहिती दिली नाही. अमेरिका आणि एलियन्स यांच्यात झालेल्या गुप्त करारानुसार एलियन्समध्ये मनावता निर्माण होईपर्यंत सुरु असलेले सर्व कार्य गुप्त ठेवण्यात येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)