ISRO ला अंतराळ मोहिमेत मोठे यश, Aditya-L1 ने Halo Orbit ची पहिली कक्षा पूर्ण (See Pics)
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या आदित्य L1 ने पहिला टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता या मोहिमेकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Aditya-L1 Mission Update: आदित्य-एल1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे मोठे मिशन आहे. भारताला या मोहिमेत यश मिळाले तर अनेक सुर्याची अनेक रहस्ये उलगडणार आहेत. आदित्य L1 ने मंगळवारी आपल्या मिशनचा पहिला टप्पा 178 दिवसात पूर्ण केला. भारताच्या पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य-एल-1 अंतराळयानाने मंगळवारी सूर्य-पृथ्वी एल-1 बिंदूभोवती आपली पहिली प्रभमंडल कक्षा पूर्ण केली, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने निवेदनात म्हटले आहे.
पोस्ट पहा-
आदित्य-एल1 मिशन ही Lagrangian point L1 येथे स्थित एक भारतीय सौर वेधशाळा आहे. आदित्य-एल1 गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर 6 जानेवारीला ते त्याच्या लक्ष्यित प्रभामंडल कक्षेत गेले. आदित्य-L1 अंतराळ यानाला प्रभामंडल कक्षेत L1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात. इस्रोने सांगितले की, हॅलो कक्षेत प्रवास करताना, अंतराळ यानाला विविध त्रासदायक शक्तींचा सामना करावा लागेल, ज्यासामाना करत ते लक्ष्यित कक्षेतून बाहेर पडेल.