Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy M02 उद्या होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याच्या किंमतीसंदर्भात आणि फिचर्ससंदर्भात काही माहिती समोर आली आहे.
सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M02 संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून लीक्स आणि अनेक खुलासे समोर येत आहेत. Galaxy M02 हा मागील वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy M01 स्मार्टफोनची अपडेट केलेली आवृत्ती असेल. जी कंपनी कमी किंमतीत आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच करणार आहे. Samsung Galaxy M02 उद्या भारतात अर्थात अधिकृतपणे 2 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याच्या किंमतीसंदर्भात आणि फिचर्ससंदर्भात काही माहिती समोर आली आहे.
Samsung Galaxy M02 ची संभाव्य किंमत -
ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन इंडियावर Samsung Galaxy M02 विक्रीसाठी उपलब्ध असेल. लॉन्च होण्यापूर्वी त्याची मायक्रो-साइट अॅमेझॉन इंडियावर प्रसिद्ध झाली आहे. या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. अॅमेझॉनवर Samsung Galaxy M02 सह 6 ????? असं लिहिलं आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, कंपनी हा स्मार्टफोन 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात लाँच करू शकते. (Redmi Note 10 5G लवकरच होऊ शकतो भारतात लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये)
Samsung Galaxy M02 ची संभाव्य वैशिष्ट्ये -
Samsung Galaxy M02 अॅमेझॉन इंडियावर सूचीबद्ध करण्यात आला आहे. या यादीनुसार या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले आहे. बॅटरी बॅकअपसाठी, यात 5000mAh ची बॅटरी असेल. तथापि, अद्याप त्यातील अधिक वैशिष्ट्यांबद्दल माहिती उघडकीस आलेली नाही. परंतु, लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर वर काम करेल. यात 3 जीबी रॅमसह 32 जीबीचे अंतर्गत स्टोअरेज देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 13 एमपी प्राइमरी सेन्सर असेल. यात सेल्फीसाठी 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाईप सी पोर्टही दिले जाऊ शकते.