Samsung Level U2 वायरलेस ईयरफोन भारतात लाँच, याचा बॅटरी बॅकअप ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

हा ईयरफोन भारतीय बाजारात असलेल्या अन्य ईयरफोन्स (Earphone) जबरदस्त टक्कर देणार आहे.

Samsung Level U2 Earphone (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवा नेकबँड स्टाइल ईअरफोन Level U2 भारतात लाँच केला आहे. या ईअरफोन्समध्ये तुम्हाला संगीताचा, आवाजाचा उत्कृष्ट अनुभव घेता येईल. हा ईअरफोन बेस्ट इन क्लास साउंड आणि क्रिस्टल क्लियर कॉल क्वालिटीला (Call Quality) सपोर्ट करतो. यात स्टायलिश आणि एरगोनॉमिक डिझाईन पाहायला मिळते. हा ईयरफोन भारतीय बाजारात असलेल्या अन्य ईयरफोन्स (Earphone) जबरदस्त टक्कर देणार आहे.

Samsung Level U2 ईयरफोन दोन रंगात उपलब्ध आहे. काळ्या आणि निळ्या रंगात असलेला हा ईयरफोन ऑनलाईन शॉपिंग साइट Flipkart आणि सॅमसंगच्या अधिकृत ई-स्टोरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या ईयरफोनची किंमत 1,999 रुपये आहे.हेदेखील वाचा- Samsung कंपनीच्या 'या' स्मार्टफोन्समध्ये यापुढे मिळणार नाही अपडेट

हा ईयरफोन IPX2 वॉटरप्रुफ रेटिंगसह येतो. त्यामुळे पाणी आणि घामापासून याचे संरक्षण करता येतो. तसेच पाणी आत गेल्यास ती खराब होण्याची शक्यता फार कमी असते. या ईयरफोनचे वजन 41.5 ग्रॅम इतके आहे. याचाच अर्थ हा ईयरफोन वजनाने खूप हलका आहे.

हा SBC, AAC आणि स्केलेबल codec ला सुद्धा सपोर्ट करतो. या ईयरफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 500 तासांची बॅटरी बॅकअप मिळते. कंपनीचा असा दावा आहे की, या ईयरफोनवर तुम्ही 18 तासांपर्यंत म्युजिक प्लेबॅक आणि 13 तासांपर्यंत कॉल टायमिंग बॅटरी बॅकअप मिळते. यात चार्जिंगसाठी USB Type C पोर्टसुद्धा दिला गेला आहे.

Samsung Level U2 ईयरफोन अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात Bluetooth 5.0 सपोर्ट मिळते. यात 12mm चे स्पीक यूनिट दिले गेले आहे. यात कॉलिंगसाठी दोन मायक्रोफोन दिले गेले आहेत. हे मायक्रोफोन स्केलेबल codec टेक्नोलॉजीसह येतात. कंपनीचा दावा आहे की जवळपासच्या वायरलेस तपासून सीमलेस प्लेबॅकचा अनुभव देतात.