Samsung ने लॉन्च केला नवा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स
Samsung Galaxy A3 Core असे त्याचे नाव असून हा स्मार्टफोन सध्या अफ्रिकेत उतरवण्यात आला आहे.
Samsung कंपनीने त्यांचा एन्ट्री लेव्हल सेगमेंटला वाढवण्यासाठी यामध्ये एका नव्या स्मार्टफोनचे लॉन्चिंग केले आहे. Samsung Galaxy A3 Core असे त्याचे नाव असून हा स्मार्टफोन सध्या अफ्रिकेत उतरवण्यात आला आहे. कंपनीचा हा नवा स्मार्टफोन Android Go अॅडिशनवर आधारित आहे. यामध्ये युजर्सला प्री-इंस्टॉल्ड गुगल गो अॅडिशन अॅप्स दिले जाणार आहेत. जे स्मार्टफोनच्या वापरला अतिशय सोप्पे आणि उपयोगी ठरणार आहेत. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षात लॉन्च केलेल्या Galaxy A2 Core चे अपग्रेडेट वर्जन आहे.(Samsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स)
Samsung Galaxy A3 Core हा स्मार्टफोन अफ्रिकेत लॉन्च केला आहे. तर Nigeria च्या ट्विटर अकाउंटवर स्मार्टफोनच्या किंमती संदर्भात खुलासा केला आहे. या स्मार्टफोनची किंमत NGN 32,500 म्हणजेच 6200 रुपये आहे. कंपनीचा स्मार्टफोन स्टोअर्स आणि पार्टनर स्टोअर्स येथे उपलब्ध असणार आहे. यामध्ये ब्लू, रेड आणि ब्लॅक कलर वेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे. परंतु भारतात हा स्मार्टफोन कधी उपलब्ध करुन देणार या बद्दल अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
सॅमसंग कंपनीच्या Samsung Galaxy A3 Core स्मार्टफोनसाठी 5.3 इंचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. ज्याची स्क्रिन रेजोल्यूशन 720X1480 पिक्सल आहे. यामध्ये 16:9 आस्पेक्ट रेश्यो सुद्धा आहे. स्मार्टफोन quad-core चिपसेटवर आधारित असून याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. यामध्ये 1GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. जो युजर्सला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.(स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवायची असल्यास 'या' महत्वाच्या टीप्स जरुर लक्षात असू द्या)
पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 3,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी मायक्रो युएसबी चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. स्मार्टफोनमध्ये युजर्सला 8MP चा सिंगल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तर फोनच्या फ्रंटला 5MP चा कॅमेरा दिला जाणार आहे. त्याच्या मदतीने युजर्सला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. फोनमध्ये वायफाय, ब्लुटूथ 5.0, जीपीएस, एलटीई आणि 3.5mm हेडफोन सारखे फिचर्स दिले जाणार आहेत.